Ticker

6/recent/ticker-posts

संभाजी ब्रिगेडकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

शेतकऱ्यांना मिळणाऱ्या फळबाग लागवड योजनेच्या अनुदान व इतर समस्यांसाठी संभाजी ब्रिगेडकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

 सोलापूर : संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांसाठी  निवेदन देण्यात आले. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना २०२४ व२०२५ मधील या योजनेचे अनुदान अजूनही मिळालेले नाही,यावर्षी झालेल्या अतिरिक्त पावसामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांचे पूर्णतः नुकसान झालेले आहे. तसेच शेतकऱ्यांना अधिक लावलेले निकष व तांत्रिक अडचणी यामुळे  पिक विमा ही मिळत नाहीये. अगोदरच शेतकरी कर्जबाजारी असताना पुन्हा या आसमानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांची नुकसान झाल्यामुळे शेतकरी भयानक अशा आर्थिक संकटात सापडलेला आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण जास्त असताना त्यात शासनही शेतकऱ्यांना आणखी अडचणीत आणत आहे.





कृषी खात्यात चौकशी केली असता फळबाग लागवड योजनेसाठी मिळणारे अनुदान मिळत नाही म्हणाल्यावर कृषी खात्याकडे निधी उपलब्ध नसल्याचे सांगून बुडवा उडवी चे उत्तर दिले जात आहेत यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी ह्या वाढतच चाललेल्या आहेत. यासाठी आज शेतकऱ्यांसाठी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले व विनंती करण्यात आली २०२४ व २०२५ थकीत अनुदान लवकरात लवकर मिळावे,पावसामुळे झालेल्या फळबागांसाठी नुकसान भरपाई मिळावी तसेच थकीत असलेला पिक विमा लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळावा यासाठी आपण सहकार्य करावे अन्यथा संभाजी ब्रिगेड शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून जन आंदोलन करेल असा इशारा संभाजी ब्रिगेड कडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. 




या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले, महानगर प्रमुख शिरीष जगदाळे,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनलदास,वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष कदम,शहराध्यक्ष मनीषा कोळी,जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले,उद्योग आघाडी शहर अध्यक्ष संतोष सुरवसे,जिल्हा सचिव सिद्धाराम सावळे,शहर कार्याध्यक्ष सतीश वावरे व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.