Ticker

6/recent/ticker-posts

जुळे सोलापुर येथील लक्ष्मी-समर्थ मंदिरात श्री दत्त जन्मोत्सव दिमाखात साजरा.

जुळे सोलापुरातील उद्धव नगर येथील लक्ष्मी-समर्थ मंदिरात श्री दत्त जन्मोत्सव दिमाखात साजरा.

सोलापूर : श्रीदत्त जन्मोत्सव सोहळा जुळे सोलापुरातील उद्धव नगर भाग एक मधील जागृत लक्ष्मी समर्थ मंदिरात आज मोठ्या भक्ती भावाने साजरा करण्यात आला. 



सायंकाळी 7:30 वाजता लक्ष्मी समर्थ मंदिरात ज्योतीताई मनोज कुमार अलकुंटे यांच्या वतीने श्रीदत्त दिगंबर महाराज यांची आरती व स्त्रोत पठणाचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात करण्यात आला व नंतर श्री गणेशाची आरती,श्री महालक्ष्मीची आरती,श्री स्वामी समर्थाची आरती,करण्यात आली होती. जुळे सोलापुरातील अनेक नगरातील नागरिकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात शिस्तबद्ध पद्धतीने रांगा लागल्या होत्या.


 
जागृत लक्ष्मी समर्थ मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे जो कोणी स्वामीभक्त सलग पाच गुरुवार मनोभावे दर्शन घेईल त्यांचे सर्व मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत असे प्रत्यक्ष स्वामीभक्त हे आवर्जून सांगत होते.

दर्शन झाल्यानंतर स्वामीभक्त भाविकांना महाप्रसादाचे वाटप प्रभाग क्रमांक 26 च्या नगरसेविका राजश्री अनिल चव्हाण,सौ.अनिता राठोड,मीनाक्षी युवराज राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी अमित डोंबाळे,नीलू वाघमारे, अंजू शिकारे,शशांक इंगोले,पत्रकार संदीप वाडेकर, यशवंत गुरव,डॉक्टर साक्षी गोटे, व तसेच समस्त श्री लक्ष्मी समर्थ सेवेकरी ग्रुप मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

सदर श्रीदत्त जन्मोत्सव सोहळा व्यवस्थित रित्या पार पाडण्यासाठी मनोज कुमार अलकुंटे,आकाश अलकुंटे, तात्यासाहेब इंगोले यांनी मोलाचे परिश्रम घेतले आहे.