Ticker

6/recent/ticker-posts

लाडक्या बहिणींसाठी लखपती दीदी योजना आणू;देवेंद्र फडणवीस यांच आश्वासन




सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अक्कलकोट येथे जाहीर सभा झाली.भारतीय जनता पार्टी,अक्कलकोट,मैनदर्गी,आणि दुधणी या तीन गावात लढत आहे.अक्कलकोट येथे मिलन कल्याणशेट्टी,दुधणी नगरपरिषद साठी अतुल मेळकुंदे,मैनदर्गी नगरपरिषदसाठी अंजली बाजारमठ हे भाजप उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री जयकुमार गोरे,हे रविवारी सकाळी अक्कलकोट येथे दाखल झाले होते. भाजपचा प्रचार करताना,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्कलकोटच्या विकासासाठी भरगच्च सुविधा देण्याचे आश्वासन दिले आहे.लाडक्या बहिणींना भविष्यात लखपती करण्यासाठी भाजप लखपती दीदी योजना आणणार आहे,अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

अक्कलकोट मध्ये तगढी लढत - भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी स्वतःच्या भावाला नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उभे केले आहे.मिलन कल्याणशेट्टी असे भाजप आमदाराच्या बंधूचे नाव आहे. भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवसेना शिंदें गटाकडून रईस टिनवाला,काँग्रेसकडून अश्फाक बळोरगी हे तगडे उमेदवार रिंगणात उभे आहे. अक्कलकोट शहरात मुस्लिम आणि लिंगायत मतदारसंख्या अधिक असल्याने दोन समाजावर जास्त लक्ष केंद्रित केले जात आहे.

दुधनी नगरपरिषद निवडणुकीत भाजपचे अतुल आणि शिंदें गटाचे प्रथमेश म्हेत्रेत लढत - दूधनी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपकडून अतुल मेनकुंदळे आणि माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांचे पुतणे शिवसेना शिंदें गटाकडून प्रथमेश म्हेत्रे यांच्यात लढत सुरू आहे.भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी दुधनी नगरपरिषदेत ताकद लावली आहे.