Ticker

6/recent/ticker-posts

संभाजी ब्रिगेड ने दिली वृद्धांना आपुलकीचे उब...


सोलापूर : संभाजी ब्रिगेड च्या वतीने अक्कलकोट रोड येथील आधार वृद्धाश्रमात जाऊन तेथील सर्व वृद्धांना हिवाळ्यातील थंडी पासून बचावासाठी उबदार ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले. संभाजी ब्रिगेड ने सामाजिक भावनेतून वृद्धाश्रमातील वृद्धांना एक आपुलकीची उब त्यांना मिळावे व आम्ही त्यांचे कोणीतरी लागतो या सामाजिक भावनेतून संभाजी ब्रिगेडच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आई-वडिलांची आजोबा या भावनेतून वृद्धांना उबदार ब्लॅंकेट चे वाटप केले. 




यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले,शहराध्यक्ष शिरीष जगदाळे,महिला जिल्हाध्यक्ष मीनल दास,वकील आघाडी जिल्हाध्यक्ष एडवोकेट गणेश कदम,जिल्हा संपर्कप्रमुख शत्रुगुण माने,महिला आघाडी शहराध्यक्ष मनीषा कोळी,शहर उपाध्यक्ष दिलीप भोसले, जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले,शहर व जिल्हा सचिव सिद्धाराम सावळे,सतीश वावरे,जयश्री जाधव यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे अनेक कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.