Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूरचे आराध्य दैवत ख्वाजा हाजी सैपन मुलुख यांचा 892 उर्स

हिंदू मुस्लिम एकीचे प्रतीक म्हणजे हैद्रा येथील दर्गाह

सोलापूर जिल्ह्यातील आराध्य दैवत हजरत ख्वाजा हाजी सैपन मुलुख यांचा 892 उर्स 16 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. सर्वच जाती धर्माचे लोक हजरत ख्वाजा सैपन मुलुख या दर्ग्याला पूजनीय मानतात. त्यामुळे हैद्रा (ता.अक्कलकोट) येथील उर्सला अनन्यसाधारण महत्व आहे. हैद्रा येथील दर्ग्याचे विश्वस्त(ट्रस्टी) यांनी उर्स बाबत अधिकृत माहिती दिली आहे. 16 नोव्हेंबर रोजी मुस्लिम रितीरिवाजप्रमाणे संदलचे कार्यक्रम संपन्न होणार आहे. 17 नोव्हेंबर रोजी चिराग लावणे आणि कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 18 नोव्हेंबर रोजी पहाटे फातिहा प्रार्थना,प्रसाद वाटप आणि दर्शन होणार आहे.

हैद्रा येथील हजरत ख्वाजा दर्ग्यात हिंदू मुस्लिम मोठ्या संख्येने सहभागी होतात. सर्व जाती धर्मासाठी हे दर्गा खुली आहे,आणि उर्स मध्ये सहभागी होण्याचे आवाहन दर्ग्याचे ट्रस्टीनी केले आहे. हैद्रा येथील हजरत ख्वाजा सैपनमुलूख दर्ग्याला हिंदू मुस्लिम एकीचे प्रतीक आणि श्रद्धास्थान मानले जाते. सर्वच जाती धर्माचे लोक या दर्ग्यात येऊन नवस मागतात आणि पूर्ण होते. उर्समध्ये कोणत्याही प्रकारची घाईगडबड होणार नाही,पोलिसांचा योग्य तो बंदोबस्त तैनात केला आहे.