सोलापूर : मोहोळ तालुका येथे कोरोना काळापासून बंद पडलेला सिद्धेश्वर एक्स्प्रेस थांबा पूर्ववत सुरू झाल्याबद्दल भाजपा राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्यी भेट घेऊन,त्यांनी यासाठी केलेल्या विशेष प्रयत्नांबद्दल मोहोळ तालुक्यातील नागरिकांच्या व चेंबर ऑफ कॉमर्स यांचे वतीने त्यांचा सत्कार करण्यात आले.
तसेच चेंबर ऑफ कॉमर्स,मोहोळ यांच्यावतीने मोहोळ रेल्वे स्थानकावर हुतात्मा एक्सप्रेस,इंद्रायणी एक्सप्रेस, चेन्नई मेल याही रेल्वे गाड्यांचा कायमस्वरूपी थांबा मिळावा म्हणून केंद्रीय रेल्वेमंत्री यांना शिफारस पत्र मिळणेबाबत त्यांना आशयाचा निवेदन देण्यात आले. यावेळी खासदार महाडिक यांनी सर्व बाबींवर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर यावर तोडगा निघेल,असा विश्वास व्यक्त केला.
मोहोळ शहरातील बाजारपेठ विस्तृत असून तालुक्याची लोकसंख्या सुमारे 2,50,000 आहे. याचबरोबर तीन राष्ट्रीय महामार्ग मोहोळ शहरातून जातात. चिंचोली इंडस्ट्रियल इस्टेट आणि चंद्रमौळी इंडस्ट्रियल इस्टेट हे मोठे औद्योगिक पट्टे येथे आहेत. मोहोळ तालुक्यातील रुग्ण उपचारासाठी पुण्याकडे जातात,तर व्यापारी व्यवसाय आणि खरेदीसाठी पुणे,सोलापूर आदी शहरांचा प्रवास करतात.
तसेच मोहोळ शहराजवळ श्री क्षेत्र वडवळ,श्री क्षेत्र मोहोळ आणि पंढरपूर ही महत्त्वाची धार्मिक स्थळे आहेत,जिथे मोठ्या संख्येने भक्तांची ये-जा चालू असते. या सगळ्या पार्श्वभूमीवर वरील रेल्वे गाड्यांचे कायमस्वरूपी थांबे मोहोळ येथे देण्यात यावेत,याबाबत ही सविस्तर चर्चा केली. जर वरील रेल्वे गाड्यांचे थांबे मोहोळमध्ये कायमस्वरूपी मंजूर झाले,तर व्यापारी,विद्यार्थी,रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रवासाची सोय मोठ्या प्रमाणात होईल.
यावेळी चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष प्रवीण नाना डोके,भाजपा नेते सोमेश (आबा) क्षीरसागर,हरिश्चंद्र बावकर,महेश आंडगे,रविकिरण कोरे,अतुल गावडे,नागेश पुराणिक,नैईमुद्दीन शेख,सचिन कवठे,बाळासाहेब क्षीरसागर,उमर भाई शेख यांच्यासह चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
