Ticker

6/recent/ticker-posts

रविराज साबळे पाटील याच्या वरती बार्शी तालुका पोलीस ठाणे येथे...


“रविराज साबळे पाटील यांच्या वक्तव्यावरून ताडसौंदणे येथील दत्तात्रय पाटील यांची बार्शी तालुका पोलीस स्टेशन येथे तक्रार; भा.न्या.सं.356(2) अंतर्गत तपास सुरू”

सोलापूर : रविराज साबळे पाटील याच्या वरती शिक्षक वर्गाचा अपमान केल्याबद्दल बार्शी तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल. मौजे ताडसौंदणे येथील दत्तात्रय सुरेश पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,सोशल मीडियावर “रविराज साबळे पाटील” या नावाने फेसबुक अकाऊंटवरून एक रील पोस्ट करण्यात आली होती. त्या रीलमध्ये “मास्तरड्या तुला शेतीमधल्या वांगाचं तरी कळतं का?” असा अपमानास्पद शब्दप्रयोग करण्यात आले. या वक्तव्यामुळे शिक्षक बांधवांच्या भावना दुखावल्या,तसेच फिर्यादी व स्थानिक समाजात अस्वस्थता निर्माण झाली. त्यामुळे फिर्यादी दत्तात्रय पाटील यांनी बार्शी पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली.



या तक्रारीवरून अदखलपात्र अहवाल क्र. 794/2025 नोंद झाला असून, भा.न्या.सं. 2023 कलम 356(2) (मानहानी संबंधी कलम) नुसार पुढील कार्यवाही सुरू आहे. फिर्यादीस न्यायालयात दाद मागण्याची समज देण्यात आली असून,पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल बोबडे करत आहेत.



सदर कारवाई संविधानातील कलम 19 (2) व 21 नुसार — व्यक्तीच्या सन्मान,प्रतिष्ठा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा जपण्यासाठी करण्यात आली आहे.