Ticker

6/recent/ticker-posts

क्रेडाई तर्फे पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात!


मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या अवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर : अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम साहेबांनी पूरग्रस्त भागाचा आढावा घेताना समाजातील सर्व घटक,संस्था आणि उद्योगांना विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचे अवाहन केले होते.




या अवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत,क्रेडाई महाराष्ट्रच्या वतीने क्रेडाई सोलापूर तर्फे पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी १००० शैक्षणिक साहित्य संच वाटप करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,तिऱ्हे (ता.उत्तर सोलापूर) येथे प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आला.




प्रमुख उपस्थित मान्यवर - कुलदीप जंगम – मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर, कादर शेख – शिक्षणाधिकारी (प्राथमिक)  राजाराम भोंग – गटविकास अधिकारी उत्तर सोलापूर,बापूसाहेब जमादार – गटशिक्षणाधिकारी उत्तर सोलापूर,गोविंद सुरवसे – शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,माजी सरपंच भास्कर बापू सुरवसे,अजय सोनटक्के,भारत जाधव,देगाव केंद्राचे केंद्रप्रमुख लतीफ तांबोळी,क्रेडाई नॅशनलचे सुनील फुरडे सर,क्रेडाई महाराष्ट्र उपाध्यक्ष शशिकांत जिद्दीमणी,क्रेडाई सोलापूर अध्यक्ष अभिनव साळुंखे,उपाध्यक्ष आनंद पाटील,सचिव राजीव जी दीपाली,तसेच अभय सुराणा,अमोल कांबळे,धनप्पा लिगाडे (क्रेडाई सोलापूर कार्यालय कर्मचारी) उपस्थित होते.




कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या शुभहस्ते शालेय साहित्य किटचे वाटप करण्यात आले. यावेळी जंगम आपल्या मनोगतात सांगितले की, “पूरग्रस्त विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होता कामा नये. समाजातील उद्योगवर्ग व संघटनांनी अशा संवेदनशील प्रसंगी पुढे येऊन मदत करणे ही खरी सामाजिक जबाबदारी आहे.” क्रेडाई सोलापूरचे अध्यक्ष अभिनव साळुंखे यांनी सांगितले की, “मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम च्या अवाहनातूनच या उपक्रमाची प्रेरणा मिळाली. शिक्षणासाठी मदत करणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.” 

कार्यक्रम यशस्वीतेने पार पडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षकवर्ग,ग्रामस्थ,देगाव केंद्राचे केंद्रप्रमुख लतीफ तांबोळी आणि क्रेडाई सोलापूर टीम यांनी विशेष परिश्रम घेतले.