Ticker

6/recent/ticker-posts

जिजाऊ ज्ञान मंदिर च्या वतीने ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन



सोलापूर : जाणता राजा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ कोंडी संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

यावेळी संस्थापक अध्यक्ष गणेश निळ आणि प्राचार्य सुषमा निळ यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्राध्यापक एन.के.भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक मान्यवर उपस्थित होते.




डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक थोर आणि विद्वान होते त्यांचे विचार घेऊन आपण पुढे आलो तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये अमलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही असे मत N.K.भोसले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.




या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका अर्चना औरादे,  दादासाहेब नीळ प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कांबळे मॅडम यांनी केले.

यावेळी महापरिनिर्वाण दिनाचा उचित्य साधून अनेक चिमुकल्यांनी भारदार भाषणे केली.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे पाईक होण्याची गरज असल्याचे मत मुख्याध्यापिका अर्चना औरादे यांनी व्यक्त केले. 

आभार दादासाहेब निळ यांनी मांडले तर सूत्रसंचालन कांबळे मॅडम यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संख्येने उपस्थित होते.