महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मुस्लिम विकास व विचार मंचचे वतीने अभिवादन.
पुणे : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,सामाजिक न्यायाचे प्रणेते,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शनिवार,दि. ०६ डिसेंबर रोजी मुस्लिम विकास विचार मंचच्या वतीने देहूरोड पुणे येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आले.
देहूरोड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मुस्लिम विकास विचार मंचचे अध्यक्ष रज्जाक शेख आणि अन्वरअली शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी मुस्लिम विकास विचार मंचचे अध्यक्ष रज्जाक शेख यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ एका विशिष्ट समाजासाठी नाही, तर संपूर्ण देशातील वंचित, शोषित आणि दुर्बळ घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांनी लिहिलेली राज्यघटना ही देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि संधी प्रदान करते. सर्व समाजाने त्यांचे विचार आत्मसात करून एकोपा आणि बंधुभाव वाढवण्यासाठी काम करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे."
यावेळी हुसेन शेख, गौस सुनार, अन्वर (टेलर) शेख, सचिन जोगदंड, नितीन सोनावणे, प्रशांत जोगदंड,फारुख शहा, जाकिर सय्यद,शफी सय्यद यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. महामानवाला अभिवादन करण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांनी डॉ.आंबेडकरांच्या कार्याचे स्मरण केले.
