सोलापूर : नगरसेविका राजश्री चव्हाण यांचे पर्यटनाला यश. प्रभाग क्रमांक २६ मधील गीता नगर येथे अनेक वर्षापासून प्रलंबित कामे उदा. पाण्याची पाईपलाईन, अंतर्गत रस्ते ड्रेनेज लाईन नसल्यामुळे नागरिकांना असंख्य त्रासाला सामोरे जावे लागत होते याबाबत तेथील नागरिकांनी नगरसेविका राजश्री चव्हाण यांना निवेदन दिले होते.
नगरसेविका चव्हाण यांनी तेथे प्राधान्याने पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली होती. व शासनाच्या सुवर्ण जयंती नगरोस्थान योजनेतून अंतर्गत ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन दिले होते त्याची दखल घेऊन ड्रेनेज लाईन करून देण्यात आले होते.व नंतर आज तेथे कॉंक्रीट रस्त्याचे कामाचे उद्घाटन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आले त्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आले.
आम्ही सोलापूर महानगरपालिकेला शंभर टक्के टॅक्स भरत असून आम्हाला सुविधा उपलब्ध होत नव्हत्या त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले परंतु त्याला यश येत नव्हते. शेवटी ही बाब आम्ही नगरसेविका चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर शासन दरबारी व सोलापूर महापालिका येथे पाठपुरावा करून प्रथम आम्हाला पिण्यासाठी पाण्याची पाईपलाईन व ड्रेनेज लाईन टाकून दिली व आज काँक्रीट रस्त्याचे काम प्रत्यक्ष चालू केलेले आहे. त्यामुळे आमच्या समस्या जवळजवळ पूर्ण होत आलेल्या आहेत. उर्वरित राहिलेले लाईटचे व समोरील रस्ता हे काम फक्त नगरसेविका चव्हाण ह्याच करू शकतात असे सदर नगरातील नागरिक यांनी सांगितले अशा कर्तुत्ववान,निःस्वार्थी कार्यतत्पर, जनतेच्या हाकेला धावून येणाऱ्या नगरसेविका चव्हाण ह्या आम्हाला लाभल्या हे आमचे भाग्य समजतो भविष्यात येणाऱ्या सोलापूर महानगरपालिका निवडणूक मध्ये आम्ही संपूर्ण नगरातील व आजूबाजूच्या नगरातील नागरिक सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहू असे मनोगत व्यक्त केले.
त्याप्रसंगी सदर नगरातील संग्रामसिंह चव्हाण,दिगंबर पुकाळे,जगन्नाथ काळे,प्रशांत काळे,मीरा मोकाशी, पार्वती गायकवाड,प्रभा क्षीरसागर,शोभा सोलापुरे, सरस्वती काळे,तसेच भाजपाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण,ठेकेदार प्रसन्न जाधव,कामाठी यांच्या प्रभागातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
