स्वच्छता सेविकांचा सन्मान - महिला स्नेहमिलन मेळावा सोलापूर
सोलापूर : भारतीय जनता पार्टी,सोलापूर शहर यांच्या वतीने महिला स्नेहमिलन मेळाव्याचे आयोजन एम्प्लॉयमेंट चौक येथील इंद्रभवन बहुउद्देशीय कार्यालयात करण्यात आले.
या कार्यक्रमात सोलापूर महानगरपालिकेमार्फत कार्यरत असलेल्या स्वच्छता सेविका भगिनींचा विशेष सन्मान व गौरव करण्यात आला. शहरातील रस्ते,शाळा,सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याचे कार्य रोज निष्ठेने करणाऱ्या या भगिनी समाजाच्या खऱ्या अर्थाने स्वच्छतेच्या शिल्पकार आहेत.
या सेविकांना फराळाचे लाडू,चिवडा व मानाची ओटी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आले. हा उपक्रम भारतीय जनता पक्षाकडून प्रथमच आयोजित करण्यात आल्याने सर्व सेविका भगिनींनी भाजपा नेतृत्वाचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमास शहराध्यक्ष रोहिणीताई तळवळकर, सरचिटणीस सुधाताई अल्लीमोरे,सरचिटणीस नारायण बनसोडे,युवा मोर्चा अध्यक्ष विजय कुलथे,माजी महापौर कंचनाताई यन्नम,माजी महिला अध्यक्ष विजयाताई वड्डेपल्ली,शहर मध्य मंडळ अध्यक्ष नागेश खरात, अंबादास बाबा करगुळे,गणेश आप्पा नरोटे,मनोज दादा कलशेट्टी यशवंत पाथरूट,राणा यादव,अक्षय कोथींबीरे, अलका गवळी,सूरेखा स्वामी,सुनिता कामाठी,संपदा जोशी,अंजली वलसा,नीलिमा शितोळे,गीता पाटोळे, लक्ष्मी बदलापुरे,शोभा तोरंगी,स्वाती राऊत,दिपाली शेटे, रूपा चडचणकर,विमल बंडगर व महिला कार्यकारिणी उपस्थित होती.
कार्यक्रमात बहुसंख्य महानगरपालिका स्वच्छता सेविका कर्मचारी भगिनी तसेच विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाद्वारे भाजपा सोलापूर शहराने समाजातील स्वच्छता सेविकांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि “स्वच्छता हीच सेवा” या संकल्पनेला अधोरेखित करत सर्वांना प्रेरणा दिली.
