Ticker

6/recent/ticker-posts

प्रहारच्या नेत्यांवर अन् कार्यकर्त्यांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


सदर बाजार पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रहारच्या विरोधात दिली फिर्याद

सोलापूर : प्रहारच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात आंदोलन केले होते. अजित पवार यांच्या बॅनरला टोमॅटो मारून निषेध केला होता. प्रहारच्या आंदोलनानंतर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते व कार्यकर्ते जबरदस्त आक्रमक झाले आहेत. बुधवारी दुपारी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे सलीम सय्यद व त्यांचे कार्यकर्ते सदर बाजार पोलीस ठाणे येथे जाऊन फिर्याद दिली आहे. प्रहारच्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.अजित कुलकर्णी,खालिद मणियार,अकिब नाईकवाडी,मुजाहिद सय्यद,जुबेर फुलारी,मजीद पटेल,हजरत खान पठाण व इतर चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.



राष्ट्रवादीचे नेते पामा सलीम यांनी प्रहारला इशारा दिला आहे,लोकशाही मार्गाने आंदोलन करा,अन्यथा राष्ट्रवादी अजित पवारांचं पक्ष गप्प बसण्या सारख नाही. प्रहारचे नेते सोलापुरात आले तर त्यांना सोलापुरात फिरू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नेत्यांनी दिला आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते व माजी नगरसेवक किसन जाधव यांनी देखील प्रहारला इशारा दिला आहे. प्रहारचे नेते व कार्यकर्ते बालिश बुद्धीचे आहेत अशी संतप्त टीका किसन जाधव यांनी केली आहे.




प्रहार पक्षाने अजित पवारांविरोधात आंदोलन केल्याने प्रहार आणि राष्ट्रवादीत वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षात संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि प्रहार जनशक्ती पक्ष यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले आहे. प्रहारच्या नेत्यांनी यापुढे जर अजित पवारांविरोधात आंदोलन केलं तर राष्ट्रवादी गप्प बसणार नाही,प्रहार पक्षाचा जो कुणी नेता सोलापुरात येईल त्याला राष्ट्रवादी जबरदस्त विरोध करेल असा इशारा दिला आहे.