सोलापूर : डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी त्वरित करून मुंडे कुटुंबीयांना न्याय द्या अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्याअस्मिता गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली त्या संदर्भात त्यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना प्रतिनिधिक स्वरूपात निवेदन देऊन आपल्या भावना तीव्र आहेत त्याची त्वरित दखल घ्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली संपदा मुंडे प्रकरणाची सखोल उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी केली.
संपदा मुंडे यांचे बंधू यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी आज पर्यंत का झाली नाही असा जाब विचारला याकडेही त्यांनी लक्ष वेधले या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून गुन्हेगारांवर कारवाई करून स्वर्गीय डॉक्टर संपदा मुंडे व संपूर्ण मुंडे कुटुंबीयांना न्याय द्यावा अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी शहर संघटिका स्वाती रुपनर, उपशहर संघटिका जयश्री पाटील, मीना सुरवसे,वैशाली सातपुते,श्रीदेवी बगले,मीना लेंडवे आदि महिला पदाधिकारी उपस्थित होते.
