Ticker

6/recent/ticker-posts

अजित दादा २१ कोटींची स्टॅम्प ड्युटी माफ करताय तर शेतकऱ्यांची कर्जमाफी का करत नाही



४८ तासांत २१ कोटींची स्टॅम्पड्युटी माफ करताय तर शेतकरी कर्जमाफी का नाही

सोलापूर : प्रहार जनशक्ती पक्षाचे नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. एकीकडे अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे,शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर कर्जाचे डोंगर आहे,शेतकरी कर्जमाफी व्हायला पाहिजे अशी मागणी होत आहे. दुसरीकडे मात्र सरकारमधील भ्रष्ट नेते स्वतःच्या फायद्यासाठी मोठं मोठे घोटाळे करत आहेत प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते अजित कुलकर्णी यांनी माध्यमांसमोर बोलताना पार्थ पवार यांचा संबंध असल्याचे थेट पुरावे सादर केले आहे. अमेडीया कंपनीसोबत पार्थ पवार यांनी करार केल्याच पुरावा समोर आला आहे,त्यामुळे पार्थ पवार यावर देखील गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे,अशी संतप्त प्रतिक्रिया प्रहार पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.

४८ तासांत स्टँप ड्युटी माफ होतेय तर शेतकरी कर्ज माफी का नाही - पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील मुंढवा येथील 40 एकर जमीन शीतल तेजवाणी यांच्याकडून पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीनं खरेदी केली होती. १८०० कोटींची जमीन फक्त ३०० कोटीत विकत घेतली. ३०० कोटींची खरेदीची स्टॅम्पड्युटी २१ कोटी होते,आणि ही स्टॅम्पड्युटी ४८ तासांत माफ होते,मग शेतकरी कर्जमाफी का लवकर होत नाही असा सवाल प्रहार पक्षाच्या शहर अध्यक्षकांनी उपस्थित केला आहे.
 

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला आहे. अजित पवार यांनी  मुलासाठी शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसविले .शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडविला,त्यामुळे नैतिकता असेल तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी प्रहार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.