प्रभाग २६ मधील विष्णुपुरी येथे बेलाचे झाड पावसामुळे उन्मळून पडले.
मजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांचे युद्ध पातळीवर प्रयत्नशीलता.
सोलापूर : प्रभाग क्रमांक २६ मधील विष्णुपुरी येथे काल झालेल्या मुसळधार पावसामुळे बेलाचे झाड उन्मळून पडले होते त्यामुळे विष्णुपुरी तील नागरिकांना जाण्या-येण्यासाठी रस्ताच नव्हता. ही बाब माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांना सदर नगरातील रहिवाशी विनायक सादिगले यांनी फोन द्वारे संपर्क साधून सदर समस्या दूर करण्यासाठी सांगितल्या होत्या. त्याची दखल घेत माजी नगरसेविक चव्हाण यांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे व तसेच आपत्कालीन कक्षाचे अधिकारी प्रकाश दिवाणजी यांना यांना ही बाब निदर्शनास आणून दिल्याने तात्काळ आपत्कालीन व्यवस्थापन कडून जीसीपी उपलब्ध करून देण्यात आले होते. रात्रीचे दहा वाजेपर्यंत माजी नगरसेविका चव्हाण यांनी समक्ष उभे राहून सदर नगरातील झाड जे.सी.पी.च्या सहाय्याने बाजूला काढे पर्यंत तेथे उपस्थित होत्या.
सदर नगरातील समस्या युद्ध पातळीवर प्रयत्न करून सोडवल्याने तेथील नागरिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले की. आम्ही सदर नगरात जवळपास २५ ते ३० वर्षापासून वास्तव्यास असून २०१७ मध्ये नगरसेवकांचे निवडणूकीत माजी नगरसेविका चव्हाण ह्या निवडून आल्यापासून आमच्या नगरातील गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले ड्रेनेज,पाण्याची पाईपलाईन,अंतर्गत रस्ते,दिवाबत्ती,गणपती मंदिराचे सुशोभीकरण. प्राधान्याने करून दिलेले आहेत तसेच ज्या काही आमच्या समस्या असतील ते तात्काळ सोडवतात अशा कर्तव्यदक्ष जनतेच्या हाकेला धावून येणाऱ्या माजी नगरसेविका चव्हाण ह्या आम्हाला लाभल्या हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे व येत्या नगरसेवक निवडणूक काळात संपूर्ण विष्णुपुरी नगरातील नागरिक त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे असतील असे मनोगत व्यक्त केले.
त्यावेळी विश्वास जागीरदार काका,विनायक सादिगले, गणेश सलगरे सर,विनायक देवकर,पगारे साहेब, बिराजदार काका,बहिरामडगे सर, व्हना आजोबा,कोळपे सर मोतीवाले सर,पाटील सर,नागेश देवकर,ज्ञानेश्वर सादीगले तसेच असंख्य महिला वर्ग उपस्थित होत्या व तात्काळ रात्रीच्या वेळेस त्यांच्या समस्या दूर केल्याबद्दल मनापासून आभार मानले.