Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड...

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलातील विद्यार्थ्यांची गरुड झेप....!

 जिजाऊ ज्ञान मंदिराचाच वाजतोय सगळीकडे डंका...

20 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड...


सोलापूर :  क्रीडा व युवक संचालनालय पुणे यांच्या वतीने सोलापूर जिल्हा क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 09 सप्टेंबर 2025 रोजी मैदानी स्पर्धाचे आयोजन लक्ष्य करिअर अकॅडमी,अकोलेकाटी येथे करण्यात आले.
 
या स्पर्धेमध्ये जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मिडीयम व विजयसिंह मोहिते पाटील ज्यु. कॉलेज,कोंडी  येथील जवळपास 40 विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये फिनिक्स भरारी घेतली असून 20 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धासाठी निवड झालीय.

क्रीडा शिक्षक दिलीप भोसले यांनी सर्व विद्यार्थ्यांना मैदानी खेळाविषयी अतिशय मोलाचे आणि योग्य मार्गदर्शन केल्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रचंड मोठं यश प्राप्त करता आले. 

त्यामुळे क्रीडा शिक्षक दिलीप भोसले आणि स्पर्धेत गरुड झेप घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थापक अध्यक्ष गणेश नीळ यांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष गणेश नीळ यांनी अभिनंदन केले .आणि त्यांचा फुलांचा गुच्छ देऊन सत्कार केला. आणि जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या स्पर्धकांचे विशेष करून येणाऱ्या काळामध्ये आपले विद्यार्थी राज्यस्तरापर्यंत पोहोचतील असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

खेळामुळेच खऱ्या अर्थाने खेळाडू वृत्ती आणि शिस्त विद्यार्थ्यांमध्ये येते त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपल्या सुप्त कलेला वाव देणे काळाची गरज असल्याचे प्राध्यापक एन के भोसले यांनी सांगितले. 

14 वर्षे वयोगटातील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये मुलं व मुली
१) युध्दजीत दत्तात्रय भोसल हर्डल्स द्वितीय क्रमांक
२) संजना संजय राठोड थाळी फेक प्रथम क्रमांक गोळा फेक द्वितीय क्रमांक 
३) संस्कार भारती सुतार थाळी फेक प्रथम क्रमांक.                                १७ वर्ष वयोगटातील 
४) राजवीर विठ्ठल भोसले  भाव फेक प्रथम क्रमांक १५०० मीटर तृतीय क्रमांक 
५) पार्थ नानासाहेब खंदारे  थाळी फेक द्वितीय क्रमांक 
६) अथर्व रोहित चौगुले  ११० मीटर हर्डल्स तृतीय क्रमांक 
७) आर्यन श्रीकांत पवार गोळा फेक तृतीय क्रमांक 
८) यश मारुती गुंड   द्वितीय क्रमांक 
९) ॠतीक रमेश भोसले हॅमरथ्रो तृतीय क्रमांक __ 
१०) प्रणीता तुकाराम भोसले १०० मीटर प्रथम क्रमांक गोळा फेक तृतीय क्रमांक 
११) राहूल शिवाजी राठोड २०० मीटर तृतीय क्रमांक 
१२) आकांक्षा अनिल शिंदे गोळा फेक व थाळी फेक प्रथम क्रमांक 
१३) श्रावणी राहुल वाघचवरे हॅमरथ्रो प्रथम क्रमांक 
१४) अनुजा बिबीशन साठे हॅमरथ्रो द्वितीय क्रमांक 
१५) कोमल दादासाहेब नन्नवरे हॅमरथ्रो   तृतीय क्रमांक 
१६) संध्या ज्योतिराम रणदिवे भाला फेक प्रथम क्रमांक 
१७) राजश्री राजु तडमली भाला फेक  तृतीय क्रमांक                    १९ वर्ष वयोगटातील 
१८) सुमित संतोष राऊत ३००० मीटर प्रथम क्रमांक 
१९) तुषार ज्ञानेश्वर डोंगरे हॅमरथ्रो द्वितीय क्रमांक 
२०) आरमान मैनोद्दीन पठाण हॅमरथ्रो तृतीय क्रमांक 
२१) दिव्या दत्तात्रय गुंड १०० मीटर प्रथम क्रमांक 
२२) सिध्दी सोमनाथ घडमोडे १०० मीटर द्वितीय क्रमांक 
२३) श्रेया नारायण माने १०० मीटर तृतीय क्रमांक 
२४) सदाफ मोईन जहागीरदार गोळा फेक व थाळी फेक प्रथम क्रमांक 
२५) ॠतुजा तानाजी दळवे हॅमरथ्रो प्रथम क्रमांक व थाळी फेक तृतीय क्रमांक 
२६) वैभवी सावळा कुंभार गोळा फेक व  हॅमरथ्रो तृतीय क्रमांक 
२७) प्रतीक्षा उमेश गुंड.हॅमरथ्रो  द्वितीय क्रमांक 
२८) वैष्णवी नागनाथ दळवे भाला फेक प्रथम क्रमांक 
२९) समीक्षा कानिफनाथ क्षीरसागर थाळी फेक व भाला फेक द्वितीय क्रमांक 
३०) दुर्गा नेताजी राठोड भाला फेक तृतीय क्रमांक                १४ वर्ष मुलं रिले ४×१००   तृतीय क्रमांक 
३१) मयुरेश विरेश शिनगारे
३२) संस्कार भारत सुतार 
३३) रवी तानाजी राठोड
३४) सुशांत महादेव भोसले
३५) काटे आविष्कार प्रसेंजित.                                 १९ वर्ष मुली रिले ४×१०० द्वितीय क्रमांक 
३६) समीक्षा कानिफनाथ क्षीरसागर
३७) वैष्णवी नागनाथ दळवे
३८) श्रेया नारायण माने
३९) विशाखा विजय व्यवहारे
४०) समृद्धी समाधान मुटकुळे 

आदी विद्यार्थ्यांनी प्रचंड मोठे यश प्राप्त केले आहे. 
ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांना शहरी भागातील विद्यार्थ्यांप्रमाणे साधने उपलब्ध नसताना सुद्धा केवळ जिद्दीच्या आणि चिकाटीच्या बळावर या विद्यार्थ्यांनी उत्तर सोलापूर तालुक्यात आपल्या जिजाऊ ज्ञान मंदिर आणि आपल्या कोंडी गावाचं नाव रोशन केला असून सगळीकडे जिजाऊ ज्ञान मंदिर चा डंका वाजू लागला आहे. 
जिजाऊ ज्ञान मंदिर कोंडी हे अतिशय निसर्गरम्य अशा ठिकाणावर वसलेलं एक विद्यामंदिर असून या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कलेला वाव देण्यासाठी विशेष अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत असून येणाऱ्या काळात अनेक विद्यार्थी जिल्हा आणि राज्यस्तरापर्यंत पोहोचतील असा विश्वास यावेळी संस्थापक अध्यक्ष गणेश निळ यांनी शेवटी बोलताना व्यक्त केला. 

या कार्यक्रमासाठी प्राचार्य सुषमा निळ मुख्याध्यापिका अर्चना औरादे, विकास जाधव, क्रीडा शिक्षक दिलीप भोसले, रवि कोतकुंडे , नवनाथ भोसले आधी सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब नीळ यांनी केले.