Ticker

6/recent/ticker-posts

उपमुख्यमंत्री पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन

धमकी प्रकरण : उपमुख्यमंत्री पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन  

सोलापूर : उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या सरकारी कामात हस्तक्षेप,अडथळा आणि धमकी दिल्या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालया छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारावर येथे बेमुदत धरणे आंदोलनास प्रारंभ झालाय. पत्रकार सैफन अमीनसाब शेख असं आंदोलकाचं नांव आहे. राज्यात प्रशासनातील अधिकाऱ्यांचं मनोबल खच्चीकरण घटनेचा निषेध म्हणून हे आंदोलन सुरू आहे,असं शेख यांनी सांगितले.

३१ ऑगस्ट रविवार रोजी घडलेल्या घटनेत,करमाळा पोलीस ठाण्याच्या उपविभागीय अधिकारी अंजना कृष्णा अवैध मुरूम उपसा प्रकरणी त्यांचं कर्तव्य बजावत असताना,अवैध उपसा करणाऱ्या गाव-गुंडांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित पवार यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून ही पोलीस कारवाई रोखण्यासंबंधी कळविले. त्यावेळी उभयतांमध्ये झालेलं संभाषण प्रसार माध्यम अन् सामाजिक माध्यमावर राज्यानं पाहिलं व ऐकलं आहे. 




हा प्रकार संतापजनक तितकाचं निषेधार्ह आहे. हा संपूर्ण प्रकार प्रामाणिक अधिकाऱ्यांचं मनोबल खच्चीकरण करणारा आहे. या 'दादा' गिरीचा नि:ष्पक्ष जनतेने निषेध नोंदविला.

पोलीस अधिकाऱ्याच्या कामात थेट हस्तक्षेप करणे, बघून घेण्याची धमकी देणे हा संपूर्ण प्रकार त्यांच्या शासकीय कामात अडथळा करणारा आहे. 

या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आल्याचे पत्रकार तथा व्हिसल ब्लोअर कार्यकर्ते,आंदोलक सैफन शेख यांनी सांगितले.