अक्कलकोट येथे ईद-ए-मिलादुन्नबी,पैगंबर जयंती निमित्त रक्तदान शिबिर मोठ्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न.
अक्कलकोट : जगाला शांतीचे संदेश देणारे शांतिदूत प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबरांच्या १५०० व्या जयंतीनिमित्त अक्कलकोट तालुका युवक मुस्लिम समाज यांच्या वतीने रविवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला अक्कलकोट शहर व तालुक्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त व मोठा प्रतिसाद लाभला असून तब्बल २२३ रक्तदात्याने रक्तदान केले.
अक्कलकोट तालुका युवक मुस्लिम समाज यांनी आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिराचे रक्तदात्यानी व नागरिकांनी या रक्त दान शिबीर उपक्रमाचे मनापासून स्वागत करत कौतुक ही केले. रक्त दान शिबिराला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली.
यावेळी सैयद शाह दातापी रशाह कादरी,सैयद शाह मस्तुर शाह कादरी,अब्दुल रऊफ पीरजादे,सय्यद मुद्दसर पीरजादे,सय्यद खालील पाशा कादरी पीरजादे,सुरेचंद्र सूर्यवंशी,सद्दाम शेरीकर,ननु कोरबु,अशपाक बळोरगी,अविराज सिद्धे,पत्रकार अशपाक मुल्ला,मतीन पटेल,अतीक बागवान,रजाक सय्यद,इरफान दावना,बुडन तांबोळी,मुसा बागवान,इरफान कोरबु,मुबारक कोरबु, मोहसीन मोकाशी,नावीद डांगे यांच्यासह आदी मान्यवरांनी रक्तदान शिबिरास भेट देऊन सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
या रक्तदान शिबिराला मौलाना इब्राहिम,मौलाना सरफराज,अजीज शेख,अली पेशमाम,अयुब मल्लेभारी, रफिक उस्ताद,सिद्धेश्वर ब्लड बँक चे प्रमुख सादिक मुजावर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी युसुफ कन्नी,समीर शेख, सैपन शेख,ज्योतिबा पारखे,आयुब मल्लभारी,नूरू जवळगीकर,रुक्मोदिन खिस्तके,साकिब खिस्तके,अशरफ गोलंदाज,साजिद डांगे,अखिल फुलारी इलियास शेख यांनी सहकार्य केले. तर रशीद खिस्तके,सोहेल यांनी मोलाचे कार्य केले,शेवटी रक्तदात्यांचे व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे सामाजिक कार्यकर्ता सोहेल फरास यांनी आभार मानले.