सोलापूर : रोटरी ई क्लब ऑफ सोलापूर इलाईट आयोजित शुक्रवार ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त आयोजित नेशन बिल्डर अवॉर्ड कार्यक्रमात सोलापुरातील पाच शिक्षकांना शाल, सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे प्राध्यापिका डॉ.श्रुती वडगबाळकर या उपस्थित होत्या. हणमंत अर्जुन पवार (कै.श्रीपतराव सोनटक्के प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय तांदुळवाडी) निंगप्पा सोमनिंग व्हनमाने (श्री सोमेश्वर हायस्कूल दक्षिण सोलापूर) अश्विनी मोरे वाघमोडे (सेवासदन प्रशाला) योगीनाथ विनायक वाघोले (सिद्धेश्वर प्रशाला) सना आरिफ काखंडकीकर (सेंट जोसेफ प्रशाला ) या सर्व शिक्षकांचा गौरव करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ.श्रुती वडकबाळकर यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा पाया भक्कम करणाऱ्या शिक्षकांना आजही एकविसाव्या शतकात समाजात अतिशय मानाचे स्थान आहे. कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी हे फारसे प्राध्यापकांच्या संपर्कात येत नाहीत. पण शाळेतील विद्यार्थी हे सतत शिक्षकांच्या अवती भवती असतात. या शिक्षक दिनाचा औचित्य त्यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याचा परिचय करून दिला. पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी रोटरी क्लबचे प्रती कृतज्ञता व्यक्त करून आम्ही यापुढेही असे उत्तमोत्तम कार्य करू अशी ग्वाही दिली. रोटरी ई क्लब ऑफ सोलापूर ईलाईटचे डॉ.केदार कहाते व आदर्श गोयदानी यांना डिस्ट्रिक्ट क्लब कडून पुरस्कार मिळाल्या बद्दल क्लबच्या वतीने सत्कार करण्यात आले व क्लब मधील शिक्षकांचा पण सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी रोटरी ई क्लबचे अध्यक्ष रोटे. बालमुकुंद राठी व सचिव रोटे रोशन,भुतडा यांच्यासह सर्व पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.