Ticker

6/recent/ticker-posts

शांतीलाल मुथा फौंडेशनच्या अंतर्गत गुरुजनांचा सन्मान संपन्न.

  
सोलापूर : ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त शांतीलाल मुथा फौंडेशनच्या वतीने भारतीय जैन संघटना जिल्हा महिला विभाग सोलापूर वतीने शिक्षक दिनानिमित्त शहा कोठारी हायस्कूल मधील मुख्याध्यापक-रमेश यादवाड आणि सुधीर दुर्गे,योगिता भांदुर्गे,प्रिया उपाध्ये,सिद्धराम बिडवे,सुजाता माणिक शेटे या आदर्श शिक्षकांचा शाल आणि श्रीफळ देऊन तसेच माळा घालून राज्याचे अध्यक्ष केतन शहा व प्रविणा सोलंकी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. तसेच प्रशालेतील इतर शिक्षकांना पेन आणि पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.





ह्या वेळेस शहा यांनी राज्य व देशभरात चाललेल्या बिजेएस च्या काऱ्यांचा आढावा सांगितला,राज्य सचिव संतोष बंब यांनी शाळेला मिळालेल्या पुरस्कार बद्दल अभिनंदन केले. त्याचप्रमाणे चातुर्मास निमित्त आलेल्या गुरु महाराजांना वंदन करून त्यांचा आशिर्वाद घेण्यात आले.





या कार्यक्रमासाठी राज्याचे अध्यक्ष आदरणीय केतन शहा, राज्याचे सचिव संतोष बंब,जिल्हाध्यक्ष प्रवीण सोलंकी,सचिव निर्मला मेहता, शहराध्यक्षा कल्पना भन्साळी व शुभांगी पुजारी,माधुरी आवटे,सुजाता,उत्सुरगे
उपस्थित होते.