ग्रामीण पोलीस अधीक्षक सोलापूर यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने भोगाव परिसरातील अवैद्य धंदे बंद करण्याबाबत निवेदन देण्यात आले.
सोलापूर : सोलापूर शहराच्या जवळील उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव या गावाच्या हद्दीत कपल फ्रेंडली रूम व लॉजिंग च्या नावाखाली होणारे वेश्याव्यवसाय डान्सबार अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्यासंबंधात सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आले. व त्याबाबतचे फोटो व व्हिडिओ पुरावे हे अधीक्षकांना देण्यात आले.
हे अवैध्य लॉजिंग अवैद्य दारू विक्री वेश्याव्यवसाय सारखे व्यवसाय तातडीने बंद नाही केले तर उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव सह आजूबाजूच्या आठ गावातील ग्रामस्थ सह संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन करण्यात येईल असे इशाराही संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन द्वारा देण्यात आले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले, जिल्हा कार्याध्यक्ष शेखरजी भोसले, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनल दास,जिल्हा व शहर सचिव सिद्धराम सावळे, महिला उपाध्यक्ष मनीषा कोळी, शहर कार्याध्यक्ष सतीश वावरे, जयश्री जाधव,प्रशांत जाधव,सागर कापसे,बमु कापसे, सोमनाथ आडगळे, संकेत कापसे, समर्थ कापसे, लक्ष्मण रोकडे व भोगाव व परिसरातील बहुसंख्य ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.