सोलापूर : सोलापूर जिल्हा माढा तालुक्यातील वरवडे गावातुण ऐक हात शेतकऱ्यांचा लेकीसाठी है ब्रीद घेऊन चालू झालेली ग्रामीण विद्यार्थीनी सायकल बँक नविन वर्षा मध्ये नविन सीमा पादाक्रांत करत ज्येष्ठ समाजसेवक अणा हजारे यांच्या राळेगण सिध्दी गावात पोहचली. आण्णा हजारे यांनी केले ग्रामीण विद्यार्थिनी सायकल बँके चे कवतुक म्हणाले ग्रामीण विद्यार्थिनी सायकल बँक उपक्रम कौतुकास्पद. ग्रामीण विद्यार्थिनी सायकल बँक आणि माहेर सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण विद्यार्थिनी सायकल बँक या उपक्रमाची सुरुवात 1 जानेवारी 2025 वार बुधवार राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांच्या शुभहस्ते करण्यात आली आहे.
ग्रामीण विद्यार्थिनी सायकल बँक ही संकल्पना विश्वनाथ श्रीधर गायकवाड भारतीय व्यापारी नौदल अधिकारी,सोलापूर यांच्या संकल्पनेतून आलेली आहे. 2025 पासून माहेर सेवाभावी संस्था अध्यक्षा सुप्रिया मंडलिक या उपक्रमाच्या विस्तारासाठी काम करणार आहेत. कृषी प्रधान व्यवस्थेचे वास्तव उघड्या डोळ्यांनी पाहिले असता असे दिसते या कृषी प्रधान व्यवस्थेचा पाया कणा अर्थातच अस्सल शेतकरी सोडून बाकी सर्वांचेच हित होते हे या विशिष्ट व्यवस्थेचे वैशिष्ट्य आणि अस्सल शेतकरी वर्गाचे दुर्दैवच! पिकास भाव कर्ज वीज आणि अशा अनेक समस्यांनी त्रस्त-वैतागलेला शेतकरी आत्महत्या करतो तरीही कथित कृषी प्रधान व्यवस्था कागदावरच कार्यरत राहते.
हीच खंत दूर करण्याची जबाबदारी आपल्यासारख्या शिकलेल्या आणि नवीन विचारांचा युवकांची आहे. याच जाणिवेतून "एक हात शेतकऱ्यांच्या लेकीसाठी"
हे ब्रीद घेऊन ग्रामीण विद्यार्थिनी सायकल बँकेची स्थापना करण्यात आली आहे.
एक मुलगी शिकली तर एकाच वेळी दोन कुटुंबे सुखी होतील ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांचा व कष्टकऱ्यांचा ज्या मुली सात ते आठ किलोमीटर चा खडतर प्रवास करून शाळेला येतात अशा मुलींना रोटेशन बेसिस वरती दरवर्षी सायकल उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
राळेगणसिद्धी येथे ग्रामीण विद्यार्थिनी सायकल बँकेचे उद्घाटन माननीय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी माहेर संस्थेच्या अध्यक्ष सुप्रिया मंडलिक,निलोफर अय्याज राजे,नर्गिस शेख,अंजुम शेख,सुवर्णा कावरे,अश्विनी कावरे,रूपाली लंके इत्यादी महिलां उपस्थित होत्या.
सदर कार्यक्रमास ग्रमिन विद्यार्थीनी सायकल बँकेचे संस्थापक अध्यक्ष भारतीय व्यापारी नौदल अधिकारी यांनी इंडोनेशिया देशातून शुभेच्छा दिल्या व सुप्रिया मंडलिक यांची ग्रामीण विद्यार्थिनी सायकल बँकेच्या समाध्येशक पद्दी निवड झाल्या बद्दल त्यांचे अभिनंदन केले व ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी ग्रामीण विद्यार्थिनी सायकलर्बँकेच्या पाठी वरती कौतुकाची थाप टाकली व बँकेचे मनोबल वाढवले त्या बद्दल आण्णा हजारेंचे आभार मानले.
