Ticker

6/recent/ticker-posts

मराठी पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी पठाण यांची निवड

श्रीरामपूर मराठी पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी सलीमखान पठाण यांची निवड

श्रीरामपूर : (प्रतिनिधी) श्रीरामपूर मराठी पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी शहरातील ज्येष्ठ पत्रकार सलीमखान पठाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. श्रीरामपूर मराठी पत्रकार संघाची सभा नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी संपन्न झाली. या सभेत ही निवड करण्यात आली.

याप्रसंगी संपादक करण नवले,बेलापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्करराव खंडागळे,ज्येष्ठ पत्रकार रमेश कोठारी, पद्माकर शिंपी,पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप आहेर,विद्यमान अध्यक्ष महेश रक्ताटे,उपाध्यक्ष संतोष बनकर, सचिव सचिन उघडे,बाबासाहेब चेडे,दीपक उंडे,शेखर माळवे, नितीन चित्ते,विशाल वर्धावे आदी उपस्थित होते.

सलीमखान पठाण यांनी दैनिक सार्वमत,लोकमत समाचार, राष्ट्र सह्याद्री,कॉमन न्यूज,रयत समाचार इत्यादी वर्तमानपत्रातून प्रतिनिधी म्हणून काम केले आहे.त्यांच्या या निवडीबद्दल सर्व पत्रकार बंधू तसेच शहरातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. मराठी पत्रकार संघाच्या उपाध्यक्ष निवड झाल्याबद्दल जेष्ठ पत्रकार रमेश कोठारी,भास्करराव खंडागळे,पद्माकर शिंपी,करण नवले,प्रदीप आहेर,महेश रक्ताटे व इतरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.