पुणे : पुणे येथे २ ते ५ जानेवारी २०२६ दरम्यान होणाऱ्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलमध्ये कवीसंमेलन अध्यक्षपदी पूनम मस्तुद यांची निवड झाली आहे. भिडेवाडा देशातील पहिली मुलींची शाळा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियानांतर्गत पुणे येथे एस एम जोशी फाउंडेशन या ठिकाणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या उत्तुंग कर्तृत्वाचा प्रसार व भारतीय संविधानाविषयी जनजागृती करण्यासाठी या फुले फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने ५ जानेवारी रोजी कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कविसंमेलनाच्या अध्यक्ष म्हणून अंजनगाव (उ) येथील कवयित्री तथा वस्तू व सेवा कर विभागात कार्यरत असणाऱ्या पूनम मस्तुद यांची निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानाचे आयोजक विजय वडवेराव यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
