सोलापूर......खा.ओमराजे निंबाळकर ऑन राणा पाटील
आ.राणाजगजीतसिंह पाटील तुमच्या मुलाने ड्रग्ज घेतलं असत तर तुम्ही सहन केलं असत का?
खा.ओमराजेनी व्यक्त केला संताप
खा.ओमराजेनी थेट दारूच्या पार्टीचा तो फोटो दाखवला
सोलापूर : धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर हे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. तुळजापूर येथे नगरपरिषदेच्या निकालावरून कुलदीप मगर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात कुलदीप मगर हे सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. खा.ओमराजे निंबाळकर हे कुलदीप मगर यांची भेट घेण्यासाठी आले होते. यावेळी माध्यमांना बोलताना तुळजापूरचे स्थानिक आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपीची पाठराखण का करत आहेत. असा सवाल खा.ओमराजे निंबाळकर यांनी उपस्थित केला आहे. पिटु गंगणे यांनी आणलेला ड्रग्ज तुमच्या मुलाने घेतलं असत आणि त्याला त्याच वेसन लागला असता तर तुम्ही सहन केला असता का?. कोणता बाप हे सहन करेल ?. तुम्ही विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केला,तुळजापूरची बदनामी होत आहे म्हणून तुम्ही लक्षवेधी केली,अशी दुटप्पी भूमिका ठेवू नका. पिटु गंगणे तुम्हाला ब्लॅकमेल करत आहे का?.तुमच काही अडकलाय का?. अशा शब्दांत खा.ओमराजे यांनी आ.राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
खा.ओमराजेनी त्या दारू पार्टीचा फोटो दाखवत उपस्थित केला तुळजापूरच्या बदनामीचा प्रश्न - खा. ओमराजे निंबाळकर यांनी मोबाइल मधून फोटो दाखवत पुन्हा एकदा तुळजापूरच्या बदनामीचा प्रश्न उपस्थित केला आहे. निवडणूकी नंतर एका शेतात दारूची पार्टी करत असतानाचा फोटो समाजमाध्यमांवर वायरल झाला आहे. अशा दारूच्या पार्ट्याच फोटो वायरल झाल्यानंतर तुळजापूरची बदनामी होत नाही का असा संताप व्यक्त करत आ.राणा जगजीतसिंह पाटील आणि पिटु गंगणे यांच्यावर निशाणा साधला आहे. पुढे बोलताना खा.निंबाळकर म्हटले, तुम्ही शेण खाल्लं आणि तुम्हाला शेण का खाल्ले असे विचारले असता तुळजापूरची बदनामी का करतंय म्हणून आम्हाला विचारता
