भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या प्रयत्नाला यश..
सोलापूर : प्रभाग क्रमांक २६ मधील पाटलीपुत्र नगर,सुभाष शहा नगर,प्रिसिजन कॉलनी,समोरील आय एम एस कॉलेज, बुद्ध विहार येथे ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळे घाण पाणी वरील नगरात सर्वत्र पसरले होते त्यामुळे नागरिकांना घरात राहणे मुश्किल झाले होते व दुर्गंधीमुळे ज्येष्ठ नागरिक महिलावर्ग आजारी पडत होते.
सदर नगरातील नागरिकांनी सोलापूर महानगरपालिका व झोन कार्यालयाकडे तक्रारी केल्या होत्या परंतु दखल घेत नव्हते. सदर समस्या बाबतीत माजी नगरसेविका चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तात्काळ सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे यांना सदर समस्या सांगितल्यानंतर तातडीने जेसीपी व कर्मचारी पाठवून देऊन युद्ध पातळीवर तेथील समस्या दूर करण्यात आले.
त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक महिलावर्ग यांनी आपले मनोगत व्यक्त केले की आम्ही सदर नगरामध्ये वास्तव्यास राहत असून शंभर टक्के टॅक्स भरत असतो परंतु आम्हाला म्हणाव्या तशा नागरिक सुविधा मिळालेल्या नाहीत. माजी नगरसेविका चव्हाण या आमच्या समस्या बाबतीत सातत्याने शासन दरबारी व सोलापूर महानगरपालिका आयुक्त येथे पाठपुरावा केलेला आहे. त्यामुळे आमची बरीच कामे झालेली आहेत उर्वरित कामासाठी ही त्यांचा पाठपुरावा चालूच आहे.
आमच्या समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तात्काळ आमच्या समस्या मिटवल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांचा नगरसेवकाचा कार्यकाल सुद्धा संपलेला असताना सुद्धा त्या नागरिकांच्या मदतीला धावून येतात ही कौतुकाची बाब आहे. सध्या निवडणुकीच्या लगबगीत सुद्धा वेळात वेळ काढून जातीने आमच्या समस्या सोडवल्या आहेत.अशा नागरिकांच्या मदतीला धावून येणाऱ्या नगरसेविका चव्हाण ह्या आम्हाला लाभल्या आमचे भाग्य समजतो. तर एक कॉल... प्रॉब्लेम सॉल... याची प्रचिती प्रत्यक्षात आली असे मनोगत व्यक्त करून जलद गतीने समस्या सोडवल्या बद्दल माजी नगरसेविका चव्हाण यांचे मनापासून आभार मानले.
