सोलापूर : भारतीय जनता पक्षाने नगरपालिका निवडणुकीत २५ मुस्लिम उमेदवारांना मैदानात उतरविले होते. त्यापैकी १३ उमेदवार निवडून आले आहेत.
जिल्ह्यातील ११ नगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल रविवारी २१ डिसेंबर रोजी जाहीर झाला. या निवडणुकीत आठ नगरपालिकांमध्ये भाजपने मुस्लिम उमेदवारांना आखाड्यात उतरवून सोशल इंजिनिअरिंग केले होते. अक्कलकोटमध्ये ५, दुधनी २, मैंदर्गी ४, करमाळा २, मंगळवेढा १ मोहोळ ५, सांगोला १ तर बार्शीत ६ उमेदवारांचा समावेश होता. त्यापैकी पाच नगरपालिकांतील १३ उमेदवार निवडून आले आहेत. मंगळवेढा,करमाळा,दुधनीतून एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही.
भाजप हा पक्ष मुस्लिम उमेदवार उभा करत नसल्याची चर्चा गेल्या काही वर्षांत पुन्हा पुन्हा झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात भाजपने मुस्लिम समाजातील उमेदवार दिल्यावरून अनेक समाजघटकांत चर्चा सुरू होती.
नगरपालिकानिहाय विजयी उमेदवार पुढील प्रमाणे
१) बार्शी - आबेदा तांबोळी,फरजाना जलसे.
२) अक्कलकोट - शमसुद्दीन शेरीकर,जावीद डांगे,अल्फिया कोरबू.
३) सांगोला - जुबेर मुजावर.
४) मोहोळ - शाईस्ता शेख,शयनाज तलफदार,शम्सुद्दीन कुरेशी.
५) मैंदर्गी - अब्दुलगनी बाबुडे,मेहराज लुकडे,लाडलेसाब लुकडे,रेश्मा उस्ताद असे एकूण १३ उमेदवार सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिकेतून भाजपाचे उमेदवार म्हणून निवडून आले आहेत.
