Ticker

6/recent/ticker-posts

पोक्सो कायद्यान्वये दाखल गुन्ह्यात जिल्हा सत्र न्यायालयातून जामीन मंजुर

बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) कायद्यान्वये दाखल गुन्ह्यात सत्र न्यायालयाकडून जामीन मंजुर

बार्शी : (प्रतिनिधी)  नितीन शितोळे यांचे विरूद्ध वैराग पोलीस ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 137 (2) या कलमान्वये व  बाल लैंगिक अत्याचार कायद्याचे कलम 4,8,12 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी नितीन शितोळे याचा जामीन अर्ज बार्शी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी मंजूर केला आहे.





न्यायालयात नितीन शितोळे याने जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 7:45 चे सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने माझे मुलीस फूस लावून पळून नेले आहे,अशी फिर्याद फिर्यादीने दिली होती. या फिर्यादीवरून वैराग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला व पोलिसांनी अधिक तपास करून मुलीचा शोध घेतल्यानंतर मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण नसल्याने बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम 4,8,12 याची वाढ सदर गुन्ह्यात करण्यात आली. याबाबत आरोपी विरुद्ध वैराग पोलीस ठाण्यात भा.न्या.सं.कलम 137 (2) व  बाल लैंगिक अत्याचार कायद्याचे कलम 4,8,12 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.





यात अर्जदार आरोपीने जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. सदर प्रकरणी अर्जदार यांचे वतीने वकिलांनी केलेला युक्तिवाद ऐकुन जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.के.मांडे यांनी सदरचा आरोपीचा जामीनअर्ज मंजूर केला आहे. यात आरोपी अर्जदारतर्फे ॲड.प्रशांत एडके व ॲड. सुहास कांबळे यांनी काम पाहिले.