सोलापूर : प्रभाग २६ मधील शिक्षक सोसायटी,गुरुदेव दत्त नगर,येथे हद्दवाढ झाल्यापासून ड्रेनेजची व रस्त्याची कामे झाली नव्हती त्यामुळे पावसाळ्यात असंख्य समस्यांना सामोरे जावे लागत होते. अनेक महिलावर्ग,ज्येष्ठ नागरिक,विद्यार्थी पावसाळ्यात हेरिटेज प्लांट येथे डांबरी रस्त्यावर गाडी लावून चिखलातून घराकडे जावे लागत होते तसेच ड्रेनेज नसल्यामुळे सेफ्टीटॅंक ओवरफ्लो झाल्याने संपूर्ण नगरामध्ये दुर्गंधी सुटत होती ही बाब तेथील नगरातील नागरिकांनी नगरसेविका राजश्री चव्हाण यांचे निदर्शनास आणून दिल्यानंतर तातडीने सदर बाब सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देऊन तेथील समस्या दूर करण्यासाठी सांगितले होते. त्याची दखल घेत शासनाच्या सुवर्ण योजना नगरोस्थान योजनेतून प्रथम ड्रेनेजचे काम करून घेतले व नंतर रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली.
त्यावेळी तेथे जमलेले नागरिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले की गेल्या २० ते ३० वर्षापासून आम्ही येथे वास्तव्यास असून आमच्या वरील समस्या बाबतीत लोकप्रतिनिधी, महापालिकेला,निवेदन देऊन थकलो होतो व आमची कोणीच दखल घेत नव्हते परंतु नगरसेविका राजश्री चव्हाण यांना आमच्या समस्या सांगितल्या नंतर केवळ एका महिन्यातच पाठपुरावा करून आमचा वीस ते तीस वर्षाचा वनवास संपलेला आहे अशा ह्या नागरिकांच्या हाकेला धावून येणाऱ्या नगरसेविका आम्हाला लाभल्या हे आमचे भाग्य समजतो असे मनोगत व्यक्त केले. त्याप्रसंगी छाया माळी,कोकरे मॅडम, वाघदरे काका,संपदा शिंदे,इंदिराबाई कोरे,सोमनाथ काळे,भाजप शहर सदस्य नोंदणी प्रमुख अनिल चव्हाण,प्रकाश चव्हाण,रमेश पवार आधी उपस्थित होते.
