सोलापूर : नांदणी येथील आरटीओ चेकपोस्टवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. मालवाहू ट्रक पास करण्यासाठी अडीच हजाराची लाच स्वीकारून ड्रॉवरमध्ये ठेवताना मोटार वाहन निरीक्षकासह खासगी व्यक्तीस रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी दुपारी झाली. मंद्रूप पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
पिंपरी चिंचवडचे प्रादेशिक परिवहनचे मोटार वाहन निरीक्षक तानाजी शिवाजी धुमाळ वय ४९ राहणार मूळचे लातुर अमोल अप्पासाहेब पाटील वय ५० राहणार अवंतीनगर सोलापूर अशी लाच घेतना पकडण्यात आलेल्याची नावे आहेत.
तक्रारदार हे गुजरात ते चेन्नई या मार्गावर ट्रेलर चालवतात नांदणी चेकपोस्ट ओलांडण्यासाठी अधिकारी नेहमी २ हजार रुपयांची मागणी करतात. त्यावरून त्यांनी तक्रार केली गुरुवारी दुपारी अमोल पाटील यांनी तीन हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर अडीच हजार रुपये मान्य केले. अडीच हजार लाच स्वीकारून मोटर वाहन निरीक्षक तानाजी धुमाळ यांच्यासमोरील टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवले असता दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रकमेसह ताब्यात घेतले आहे.
