सोलापूर : (एमडी२४न्यूज) नू.म.वि.शिशुशाळे येथे बुधवार ०८ जानेवारी रोजी स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावर्षी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे,"माय मराठीची थोरवी,रुजवू बालकांच्या मनी" संकल्पना घेऊन मराठी भाषा ज्या साहित्यिकांनी रचली आणि मराठी गायकांनी गायलेली बाल गीते,मराठी भाषा गौरव गीते,देशभक्तीपर गीते बसविण्यात आली होती. या कार्यक्रमाची सुरुवात ओम नमोजी आद्या या ईशस्तवनाने झाली.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे मीरा शेंडगे माजी प्राचार्य कुचन प्रशाला सोलापूर,शाळा समितीचे अध्यक्ष राजेश पटवर्धन,शि.प्र.मंडळी,पुणे नियामक मंडळ सदस्य दामोदर भंडारी,शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना कुलकर्णी तसेच यावर्षीच्या कार्याध्यक्षा अंकिता कुलकर्णी तसेच बहुसंख्येने पालक वर्ग उपस्थित होता.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले. भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे नेमके काय झाले हे मुख्याध्यापिकांनी अर्चना कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून पीपीटी द्वारे सांगितले. बीज जसे अंकुरते,मी मराठी,लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,आज आयोध्या सजली,जयोस्तुते,उठा उठा चिऊताई,या मोठ्यांना काहीच कळत नाही,किलबिल किलबिल पक्षी बोलती,गवताच पात,पंख उघडा घ्या भरारी,सांज ये गोकुळी,माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमचे सुरू. अशा वेगवेगळ्या गाण्यांवर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करीत उपस्थिततानाही डोलायला भाग पाडली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली पाटील यांनी केले. रंजन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली देशमुख यांनी केले.
