Ticker

6/recent/ticker-posts

शिवभूमी प्रांगणात शाळेच्या पहिल्या दिवशी रंगला प्रवेशोत्सव सोहळा


पुणे : निगडी परिसरात नावाजलेली शिवभूमी विद्यालयात  विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साही वातावरणात संपन्न झाला. पहित्याच दिवशी विद्याथ्याच्या चेहर्‍यावर आनद ओसंडून वहात होता.मुख्याध्यापक पाटील अश्विनी यांनी प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत केले तर उपक्रमशील तंत्रशिक्षिका कवयित्री श्रीम कोठेकर यांनी फुगे उडवून,विद्याथ्यांच्या हातात फुगे देऊन विद्याथ्याचे स्वागत केले. 



विद्याथ्यांच्या हातावर स्माईलचे स्टिकर लावून त्यांचे औक्षण करून सर्वच वगेशिक्षकांनी हा सोहळा साजरा केला. गाणी गोष्टी कृतीयुक्त गीते घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाचे शाळेचे महत्व पटवून दिले. छोटे छोटे खेळ घेऊन शेळके,पाटील सुवर्णा,अनिता देसाई योगिता कोठेकर यांनी आनंदात वाढ केली. तसेच शिस्तीचे स्वच्छतेचे महत्व विशद केले. पुढील पूर्ण वर्ष असेच उपक्रमात आनंदात जाईल अशी शाश्वती विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी व सर्व शिक्षकांनी मुलांना पालकांना दिली .