एक बेकायदेशीर चिमणी पाडली म्हणून तीनदा आमदार झालेल्या आमच्या ताईला खूप राग आला. एकदा सुप्रीम कोर्टात जाऊन,चार वेळेला हायकोर्टात जाऊन सुद्धा चिमणीला दिलासा मिळाला नाही. प्रत्येक ठिकाणी कायद्याच्या प्रत्येक कसोटीवर ती चिमणी अनधिकृत बेकायदेशीरच ठरले म्हणून ती पाडली याचा संवैधानिक पदावर असलेल्या आणि आम्हीच दोनदा निवडून दिलेल्या ताईंना इतका का बरं राग आला? ताई एक सामान्य सोलापूरकर म्हणून आम्ही तुम्हाला सोलापूरच्या विकासासाठी निवडून विधानसभेत पाठवला आहे.
गेले पन्नास वर्ष आपले पिताश्री व आपण सोलापूरचे प्रतिनिधित्व करत आहात पिताश्री तर केंद्रीय मंत्री असताना सुद्धा सोलापूरच्या प्रगतीकडे कधी पाहिलं नाही. याच कारणाने आमच्या सारख्या सामान्य लोकांनी त्यांना दोन वेळेस एक लाख पेक्षा अधिक मतांनी पाडलं. तरीही तुम्ही धडा शिकायला तयार नाही. जिथे तुम्ही स्वतः काही शिकला नाहीत तिथे दुसऱ्यांना शिकवण्याची भाषा करता. ताई तुमचे राजकारण तुमच्यासोबत पण सोलापूरच्या विकासाला तुम्ही खोडा घालत आहात हे मात्र लक्षात घ्या. उलटपक्षी तुम्ही काडादींना समजवायला पाहिजे होते की फडणवीस मुळे ही चिमणी २०१७ साली पडता पडता वाचली पुढील सहा वर्षात तुम्ही पर्यायी व्यवस्था करू शकला नाहीत ही तुमची चूक आहे. काडादी राग येणे स्वाभाविक आहे त्यांच्या लोकांना राग येणे हेही आम्ही मानून मान्य करू शकतो पण एका आमदाराला बेकायदेशीर बांधकाम पाडल्याबद्दल राग आला हे आमच्या आकलना पलीकडे आहे. तुम्ही व आपल्या पिताश्रींनी पुढाकार घेऊन काडादी व सर्व समर्थकांना समजवायला पाहिजे होतं, आणि यापुढे सोलापूरच्या विकासाला हातभार लावावे यासाठी आवाहन करायला हव होतं. तसं न करता तुम्ही गर्जना केली की सोलापूरची विमान सेवा सुरू कशी करतात ते मी बघतेच,ही तुमची बोलण्याची भाषा झाली नाही ताई. तुम्हाला सोलापूरचा विकास नकोय.
मुळात तुम्हाला व काडादींना व समर्थकांना या देशाचे संविधान मान्य नाही. कायदा मान्य नाही. कोर्टाचा निर्णय मान्य नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी बेकायदेशीर काम केलंच पाहिजे,असं डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये लिहून ठेवला आहे काय? ताई शरद पवारना माढ्याचे दहा वर्ष प्रतिनिधित्व केलं पण सोलापूरचा विकास कधीही होऊ दिला नाही आणि होऊ देणारही नाहीत हे आम्हाला चांगला माहिती आहे. महेश कोठे म्हणतात काडादींनी राजकारणात यावं आणि भाजपाला धडा शिकवावा,काडादींनी राजकारणात यावं आणि सोलापूरचा विकास करावा असं काही कोठे म्हणत नाहीत. यावरून शहराबद्दल किती तळमळ आहे तुम्हा सर्वा नेत्यांमध्ये हे लक्षात येते. आणि कुठल्याही पक्षाला कुठल्याही नेत्याला धडा शिकवणारे तुम्ही कोण? तो धडा आम्ही सामान्य नागरिक शिकवणार आहोत. तुमची शिकायची तयारी नाही हे मात्र खरं. ताई २०२४ च्या निवडणुकीत आपले पिताश्री व आपण अशा दोघांनाही पाडण्याचा आणि कायमचा धडा शिकवण्याचा बहुमान सामान्य सोलापूरकरांना मिळावा हीच श्री सिद्धेश्वर चरणी प्रार्थना. बेकायदेशीर कामांचा विजय असो.जय संविधान.
सोलापूरच्या विकासात प्रमुख अडथळा असलेली चिमणी पडली म्हणजे पडलीच आता होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू होणार म्हणजे होणार. अशक्य ही शक्य करतील ते फक्त आणि फक्त सोलापूर विकास मंच. शहाण्या माणसाने कधीच पोलीस ठाण्याची आणि कोर्टाची पायरी चढु नये असे म्हणतात. सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी सोलापूरच्या विमानसेवे साठी सोलापूरचे सगळेच पोलीस ठाणे गाठले,स्वतःवर गुन्हे नोंद करुन घेतले आणि कोर्टाची पायरी देखील चढलोय आम्ही सोलापूरकरांच्या हितासाठी.
सौजन्य - सोलापूर विकास मंच
