२०१४ साली एम पी सी बी ने विस्तारीकरणाला मंजुरी देतानाच पर्यावरण अनुमती (Environmental Clearance) अनिवार्य असल्याचे,तसेच,ती घेतल्याशिवाय एक विटाचे देखील बांधकाम करू नये,असे दिशा निर्देश स्पष्टपणे दिलेले होते. वास्तविक पहाता सदर पर्यावरण अनुमती ही दर दिवसा ५००० टन या क्षमतेपासूनच अनिवार्य असते आणि आपला कारखान्याने २००५-२००६ पासूनच ही लक्ष्मण रेखा ओलांडलेली आहे.
असे असताना देखील, ते दिशा निर्देश न जुमानता, या कायम बेकायदेशीर वागणाऱ्या, हेकट आणि उर्मट माणसाने (ही सर्व विशेषणे उच्च न्यायालयाने २०१८ साली देऊन चिमणी ताबडतोब पाडण्यास अलंकारिक भाषेत सांगितले आहे.) विस्तारीकरणाचे बांधकाम महानगरपालिकेची परवानगी न घेता चालू केले.
त्यावेळी चिमणीचे बांधकाम अर्धवट झालेले असतानाच महानगरपालिकेने कारखान्यास पहिली ४७८/२ ची नोटीस देऊन सदरचे बेकायदेशीर बांधकाम ७ दिवसात पाडावयास सांगितले. त्याला या माणसाने पत्राद्वारे सदरची मुदत ९० दिवस करण्याची विनंती केली. त्यानुसार महानगरपालिकेने ९० दिवसांची मुदत दिली.
तद्नंतर या बेअक्कल माणसाने, मान्य केल्यावरदेखील ते बांधकाम न पाडतां आपल्या मुजोर स्वभावानुसार बेकायदेशीरपणे बांधकाम पूर्ण करून सभासद शेतकऱ्यांची घोर फसवणूक चालू केली. आणी आपला बेकायदेशीरपणा लपविण्याकरीता न्यायालयीन लढाई शेतकरी सभासदांचे पैशाने सुरू केली आणी आता सर्व संपल्यावर याला राजकारणाचा रंग देउन परत एकदा सर्वांची दिशाभूल करावयास धजावतो आहे.
वास्तविक पहाता न्यायालये ही कोणत्याही पक्षाचे काम करीत नाहीत. आणी याला राजकारणाचा रंग देणे हे योग्य नाही किंबहुना तो न्यायालयाचा अपमान ठरेल.
त्यानंतर या व्यवहार शून्य माणसाने पर्यावरण अनुमती न घेताच बेकायदेशीरपणे विस्तारीत कारखाना चालू करून सभासद शेतकऱ्यांची घोर फसवणूक पुन्हा एकदा केली.
तसेच मि वारंवार दरवर्षी चिमणी बेकायदेशीर असल्यामुळे केव्हाही पाडू शकतात म्हणून जुने बॅायलर आणी मशीनरी तयार ठेवण्यास मेलवर वेळोवेळी सूचना केली,जेणेकरून सभासद शेतकऱ्यांचा उस गाळपाअभावी नुकसान होणार नाही, तरीही जाणून बुजून त्याकडे लक्ष दिले नाही.
हे सर्व या मस्तवाल माहिती शून्य माणसाने सर्व संचालक आणि सभासद शेतकऱ्यांना अंधारात ठेऊन केले आणि नेहमी बोरामणी आणि एन टी पी सी चा जप करून सर्वांची दिशाभूल करीत राहीला, त्यामुळे या सर्व प्रकारातून कारखान्याचे झालेल्या नुकसानीस हा एकटा माणूसच जबाबदार आहे. आजही हा सर्वांची दिशाभूल करण्याचाच प्रयत्न करीत आहे तरी त्याच्या भूलथापांना बळी न पडता, यानेच मा. कलेक्टर ना लिहून दिल्या प्रमाणे या विस्तारीकरणावर ₹ ३५० कोटी गुंतविले आहेत,ते आणि त्यावरील व्याज तसेच व्यवहार शून्य असल्यामुळे, सतत जवळपास सरासरी ₹ ३०० कोटीची साखर शिल्लक ठेऊन (हि बाब सर्वांना माहीत आहे तसेच याबाबत मा. बबनदादा शिंदे, मा. परिचारक,अजित पवार व ईतर अनेकांनी वारंवार साखर विका अशी सूचना केली आहे), त्यावर व्याज भरल्यामुळे आपला कारखाना जवळपास ₹ २०० कोटी नुकसानीत आणला असून,आपल्या कारखान्याला ₹ १००० कोटी देणेबाकी करून ठेवली आहे, या संपूर्ण नुकसानीला जबाबदार धरून,ही रक्कम याचेकडून आपण वसूल करून या व्यवहार शून्य माणसाला घरचा रस्ता दाखविला पाहिजे. यापुढे याच्याकडे आपला कारखाना देणे ही आपली घोडचूक ठरेल.
आताही जुने बॅायलर चालू करून गाळप करणे सहज शक्य असताना परत सभासदांची दिशाभूल करून २ हंगाम गाळप शक्य नाही असे वक्तव्य करीत आहे. तसेच सभासदांकडून परत पैसे मागण्यासही मोकळा. आणी यंदा गाळप सुरू झाल्यावर स्वत:ची पाठ थोपटून घेण्यास मोकळा परंतु संपूर्ण नुकसानीचे पैसे त्याचेकडूनच घ्यायचे असल्याने कोणीही त्याच्या काव्यास बळी पडून पैसे देउ नयेत आणी त्याला या बाबतीत जाब विचारला पाहीजे. तसेच मागील हंगामातील ₹१८००/- टन प्रमाणे कुणाचे पैसे येणे आहेत ते त्यांनी मागुन घ्यावेत.
या सर्व बाबी सर्व सभासद शेतकऱ्यांना कळणे अत्यंत महत्वाचे असल्यामुळे आपण सर्वांनी आपल्या सर्व माहीतीतील लोकांना पाठवुन सर्वांना हे माहीत होण्यास मदत करावी ही नम्र विनंती.
आपल्या कारखान्याचा हितचिंतक माजी तज्ञ संचालक
संजय भिमाशंकर थोबडे.
टीप : कारखाना सुरू करतेवेळी भाग भांडवलाकरीता घेतलेल्या ₹ ७० लाखाच्या कर्जास आमची (थोबडेंची) संपूर्ण इस्टेट बॅंक ॲाफ इंडीया कडे गहाण ठेवली होती. तरी हे एकटेच संस्थापक असल्याचे दाखवतात.तसेच मी आणि हा अधर्मराज इंजिनीयरींग पास झाल्यावर ६ महिने आपल्या कारखान्यातच काम केले आहे. त्यामुळे मला याबद्दल संपूर्ण माहीती आहे. याला १८० चा कोन नसून सरळ रेष असते हे देखील माहीत नाही म्हणजे याच्या बुद्धीची कीव करेल तेवढी कमी आहे. (परवाचे पत्रकार परिषदेत बोलला)
आपल्याच कारखान्याचे कॅपॅसीटीचा नवीन कारखाना उभारण्यास जास्तीत जास्त ₹ ५०० कोटी लागतात आणि हा ₹ १५०० कोटी नुकसान केवळ चिमणी पाडल्याने झाल्याचे सांगून सर्वांची दिशाभूल करण्याचा मुर्खासारखा केविलवाणा प्रयत्न करतो.
याने कारखान्याचे विस्तारीकरणात केलेल्या व्यवहार शून्य घोड चुका आणि आणखी काही भाग २ मध्ये.
