पहिली वर्गात प्रवेश घेतलेल्या मुलींच्या हस्ते ई-लर्निंग स्मार्ट टीव्ही चे उद्घाटन करून शाळा प्रवेशोत्सव.
सोलापूर : दि.१८ (प्रतिनिधी) अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुली-मुले शाळेत शैक्षणिक वर्ष 2023- 24 चे शाळा प्रवेशोत्सव ई- लर्निंग स्मार्ट टीव्ही चे पहिली वर्गात नव्याने प्रवेश घेतलेल्या मुलींच्या हस्ते उद्घाटन करून मोठ्या उत्साहात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गावचे ज्येष्ठ नागरिक गंगाधर प्रचंडे होते.व्यासपीठावर ग्रामपंचायतचे सदस्य ओंकार गंगोंडा,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदानंद मठपती, रेवणसिद्ध मणूरे,माजी विस्तार अधिकारी धर्मराज प्रचंडे, नागय्या मठपती,सोमशेखर,अंजली व्हट्टे,मठपती,मुख्याध्यापक मल्लप्पा कवठे,विद्याधर गुरव आदी उपस्थित होते.
प्रारंभी सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमा पूजन मान्यवरांचे हस्ते करून पहिली वर्गात नव्याने प्रवेश घेतलेल्या सर्व मुला मुलींचे गुलाब पुष्प देवून पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.तसेच इतर शाळेतून विविध वर्गात प्रवेश घेतलेले विद्यार्थिनीची स्वागत करून इयत्ता दहावी परीक्षेत यश संपादन केलेल्या शाळेच्या माजी विद्यार्थिनीची सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.याच वेळी ई-लर्निंग शिक्षण देण्यासाठी प्रत्येक वर्गात 65 इंची स्मार्ट टीव्ही बसविण्यात आले असून पहिली वर्गात प्रवेश घेतलेले मुलींची हस्ते औपचारिक उद्घाटन करून प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आले.सर्व विद्यार्थ्यांना गोड पदार्थ वाटप करण्यात आले.
माजी शिक्षण विस्तार अधिकारी धर्मराज प्रचंडे,शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रेवणसिद्ध मणुरे यांनी शाळा प्रवेशोत्सव निमित्त सर्व मुलामुलींना मार्गदर्शन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मल्लप्पा कवठे,विद्याधर गुरव,शांता तोळणूरे,लक्ष्मीबाई देगांव,कल्लय्या गणाचारी, शरणप्पा फुलारी,बसय्या स्वामी,विजयश्री एंटमन,चन्नम्मा बिराजदार,लक्ष्मीकांत तळवार,राजशेखर खानापुरे,राजशेखर कुर्ले,खाजप्पा किणगी आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरणप्पा फुलारी यांनी केले तर आभार विद्याधर गुरव यांनी मानले.
फोटो ओळ - नागणसूर (ता.अक्कलकोट)येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुली-मुले शाळेत शैक्षणिक वर्ष 2023- 24 चे शाळा प्रवेशोत्सव ई-लर्निंग स्मार्ट टीव्ही चे उद्घाटन पहिली वर्गात नव्याने प्रवेश घेतलेल्या मुलींचे हस्ते करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले .
