मेफेड्रॉन (MD) Drugs अंमली पदार्थ खरेदी-विक्री प्रकरणी अटकेतील आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालय,सोलापूर येथून सशर्त जामीन मंजूर
सोलापूर : मेफेड्रॉन (MD) Drugs या प्रतिबंधित अंमली पदार्थाच्या खरेदी-विक्री प्रकरणात जेल रोड पोलीस ठाण्यात दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी गु.र.क्र. 0500/2025 अन्वये नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यातील आरोपी मेहमूद अब्दुल गनी शेख (वय 50 वर्षे, रा.नित्यानंद नगर,साहू नगर, मुंबई) यास सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाकडून 05 डिसेंबर 2025 रोजी सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.
पोलीसांच्या प्रथम खबरी अहवालानुसार - 28 सप्टेंबर 2025 रोजी जेल रोड पोलीस ठाण्याच्या पथकाने कर्णिक नगर क्रिडांगणाजवळील मोकळ्या मैदानात सापळा रचून कारवाई केली असता अमिर हमजा अखलाख दिना या इसमाच्या ताब्यातून 29 ग्रॅम मेफेड्रॉन (MD), इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आणि चार प्लॅस्टिक पाऊच असा एकूण 72,800 रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याची नोंद आहे. चौकशीत अमिर हमजाने सदर अंमली पदार्थ अटकेतील आरोपी मेहमूद अब्दुल गनी शेख याच्याकडून मिळवून सोलापूरात विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. या खुलास्यानंतर दोघांविरुद्ध NDPS कायद्याचे कलम 8(क), 22(ब) आणि 29 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आले.
मेहमूद अब्दुल गनी शेख यास 01 ऑक्टोबर 2025 रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याने मे.जिल्हा व सत्र न्यायालय, सोलापूर येथे आपला जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. आरोपीतर्फे वकिलांनी असा युक्तिवाद केला की आरोपी निर्दोष असून त्याचा थेट सहभाग सिद्ध करणारा ठोस पुरावा उपलब्ध नाही. तपास पूर्ण झाला असून आरोपी पुराव्यावर परिणाम करणार नाही आणि त्याचा कोणताही गुन्हेगार पूर्वइतिहास नाही.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर - जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश अ.राणे यांनी 05 डिसेंबर 2025 रोजी आरोपी मेहमूद अब्दुल गनी शेख यास सशर्त जामीन मंजूर केला आहे.
या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड.कदीर औटी - ॲड. दत्तात्रेय कापुरे,ॲड.वैभव बोंगे,ॲड.ओंकार फडतरे,ॲड. रोहित थोरात,ॲड.मोहीम पठाण,ॲड.शिवरत्न वाघ,ॲड. मनिष बाबरे,ॲड.अभिषेक नागटिळक,ॲड.अजय वाघमारे आणि ॲड.त्वरिता वाघ यांनी कामकाज पाहिले.
