Ticker

6/recent/ticker-posts

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पातील गौण खनिज भ्रष्टाचार..


  ईटीएस मोजणी अहवाल २ महिन्यात सादर करा..

   विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश..

नागपूर : वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पातील गौण खनिज ईटीएस मोजणी अहवाल २ महिन्यात सादर करा असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले आहेत. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पातील गौण खनिज कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करण्यात आल्या आहेत. यामुळे सरकारचा ६०० कोटींचा महसूल बुडाल्याची तक्रार अमोल कोमावार यांनी केली आहे.




वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पातील गौण खनिज प्रकरणी आज विधानसभा उपाध्यक्षांच्या रवी भवन येथील दालनात बैठक घेण्यात आली. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पातील गौण खनिज जिल्हाधिकारी कार्यालयीन अधिकारी आणि कंत्राटदार यांनी संगनमत करत विकले. त्यात सरकारचा महसूल बुडाला आहे. उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयाकडे केलेल्या तक्रारी नंतर पुसद तसेच उमरखेड तालुक्यात तहसीलदारांनी दंडात्मक कारवाई सुरू करत १ कोटी पेक्षा अधिक दंडात्मक कारवाई केली. मात्र ही कारवाई गौण खनिज अनधिकृत घेणाऱ्या शेतकऱ्यांवर करण्यात आली. अनाधिकृत गौण खनिज विक्रेत कोण,त्यांना मदत करणारे खरे सरकार मधील अधिकारी कोण? यांची नावे मात्र दडवणिण्यात येत आहेत.



     
तहसीलदार,मंडळ अधिकारी,भूमी अभिलेख,रेल विकास निगम यांनी एकत्रित कमिटी तयार करत  ईटीएस मोजणी अहवाल दोन महिन्यात सादर करा असे निर्देश उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले आहेत. संबंधित प्रकल्पात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्या मात्र त्यानंतरही दखल का घेतली जात नाही असे उपाध्यक्ष यांनी संबंधित विभागाला सूचना दिल्या.