मोहोळ : दि.१२ (प्रतिनिधी) सोमेश तुम्ही निश्चित रहा तालुक्यासह मतदारसंघात शिंदे गटाची जोरदार बांधणी करा, आपली संघटना मोठी झाली पाहिजे त्यासाठी जनमानसात जा..त्याच बरोबर मोहोळ विधानसभा मतदारसंघातील जो खुंटलेला विकास आहे. त्या विकासकामांसाठी सरकारच्या माध्यमातून जी ताकद लागेल ती मी तुमच्या पाठीशी उभी करेन असे आश्वस्त ना.तानाजीराव सावंत यांनी केले असल्याची माहिती मोहोळचे शिवसेना शिंदेगटाचे युवानेते सोमेश क्षीरसागर यांनी माध्यमांना दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात आमचे मार्गदर्शक ,नेते तानाजीराव सावंत यांची कॅबेनेट मंत्री म्हणून निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी सोमेश क्षीरसागर मुंबई येथे गेले होते. त्यावेळी झालेल्या बैठकीची माहिती माध्यमांना देतांना पुढे म्हणाले की , मोहोळ विधानसभा मतदारसंघात व सोलापूर जिल्ह्यात शिंदे गटाचे काम करीत असताना ना.तानाजीराव सावंत यांचा आदेश व प्रा.शिवाजीराव सावंत यांचे मार्गदर्शनाखालीच काम करणार आहे.तर मतदारसंघात अनेक जनहिताचे आणि महत्वकांक्षी प्रकल्प रखडलेले आहेत.ते शासनदरबारी मार्गी लावण्यासाठी ना.तानाजीराव सावंत सर यांचे मार्गदर्शन व ताकदीची गरज आहेच आणि ती पूर्णपणे दिली जाईल असा शब्द त्यांनी दिला असल्याचा पुनरुच्चार सोमेश क्षीरसागर यांनी केला.
या प्रसंगी प्रशांत गाढवे , सुनील गाढवे , सागर गाढवे , मुजीब मुजावर, दिनेश गडदे ,द्रोणा लेंगरे, सलमान शेख, सागर गाढवे, बाळकृष्ण टेकळे, सचिन माने, रंजीत गायकवाड, अमोल माने ,नागेश लेंगरे ,सुनील लेंगरे, नितीन माने, दिनेश गाढवे सागर चौगुले, नितीन गाढवे ,आकाश गाढवे ,अच्युत गाढवे, बिरुदेव वाघमोडे , पवन खांडेकर,आदी उपस्थित होते.
