सोलापूर : आसरा चौक ते साखर कारखाना दरम्यानच्या होटगी रोडवरील नैसर्गिक नाल्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे पावसाच्या पाण्याचा प्रवाह अडल्याने रस्त्यावर पाणी साचून वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. या प्रकरणी महानगरपालिकेने तातडीने अतिक्रमणे हटवून नाल्याची साफसफाई करावी,अशी मागणी काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजयकुमार हत्तुरे यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
हत्तुरे यांनी सांगितले की,विमानतळ,हत्तुरे वस्ती,होटगी रोड व भाग्यश्री पार्क परिसरातील नागरिकांना या समस्येचा मोठा फटका बसत असून,मुसळधार पावसात पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी,अशी मागणी त्यांनी केली आहे.
