Ticker

6/recent/ticker-posts

धार्मिक सलोखा,सामाजिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी निष्पक्ष तपासाची मागणी


सोलापुरात सर्वधर्म एकता मंचाचे पोलीस आयुक्तांना निवेदन; नाझिया इलाही खान यांच्या कथित वक्तव्याची चौकशी करून कारवाईची मागणी

सोलापूर : सर्वधर्म एकता मंच,सोलापूरच्या वतीने पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांना निवेदन देऊन नाझिया इलाही खान यांनी इस्लाम धर्माचे प्रेषित पैगंबर मोहम्मद (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) आणि माँ आयेशा यांच्याविषयी कथितरीत्या केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.


निवेदनात संबंधित व्हिडिओची सत्यता फॉरेन्सिक तपासणीद्वारे पडताळण्यात यावी,प्रथमदर्शनी गुन्हा आढळल्यास भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत तात्काळ एफआयआर नोंदवावा,तसेच प्रकरणाचा निष्पक्ष, पारदर्शक आणि जलद तपास करून समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आवश्यक प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात,अशी मागणी करण्यात आली आहे.




“कोणत्याही धर्माच्या श्रद्धास्थानांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न होऊ नये. संबंधित प्रकरणात कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी,” अशी भूमिका मांडली.

या वेळी दासजी शेळके,विजयकुमार हत्तुरे,संजय बाबा शिंदे, शंकर चौगुले,गणेश कोळी,आनंद चंदनशिवे,देवेंद्र भंडारे, अनिल वसाम,अजित कुलकर्णी,युवराज राठोड,राज सलगर, श्याम धुरी,पोपटसिंग टाका,पराग शहा,विलास कटक-दौंड,मुन्नू सिंग बाबावाले,तुषार खंदारे,नागेश गायकवाड, फारुख शेख यांच्यासह विविध समाजांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सर्वधर्म एकता मंचाने आपल्या निवेदनातून धार्मिक सलोखा, सामाजिक शांतता आणि कायद्याचा सन्मान कायम राखण्यासाठी प्रशासनाने तातडीने आवश्यक ती कायदेशीर पावले उचलावीत,अशी मागणी केली.