Ticker

6/recent/ticker-posts

नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर फाशी द्या; 'व्वा' संघटनेची मागणी


सोलापूर : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या भीमराव कांबळे याला पुण्यातील विशेष न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयाचे स्वागत करत सोलापूर येथील व्वा (WOW) संघटनेने आरोपीची फाशीची शिक्षा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून शक्य तितक्या लवकर अंमलात आणावी, अशी मागणी केली आहे.



या निर्णयानंतर संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, "आज खऱ्या अर्थाने आमच्या चिमुकलीला श्रद्धांजली वाहिली गेली आहे. ती चिमुकली सोलापूरची नात होती. अवघ्या ५५ दिवसांत न्यायालयाने दोषीला फाशीची शिक्षा सुनावून जलद न्याय दिला आहे. आता पुढील सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोषीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा अंमलात आणावी."


विशेष न्यायाधीश एस.आर.साळुंके यांनी शिक्षा सुनावताना आरोपीला कठोर शब्दांत सुनावणी केली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पीडितेला न्याय मिळाल्याची भावना समाजात व्यक्त होत असून, महिलांमध्येही समाधानाचे वातावरण आहे.
यावेळी विद्या लोलगे, मदिना पटेल, पुष्पा हलकुडे, शारदा मसुदी, अफ्रिन पटेल, उषा नरले, अर्चना आवारे, अनुजा उमाटे यांच्यासह व्वा संघटनेच्या महिला पदाधिकारी व सदस्य उपस्थित होत्या.