सोलापूर : दि.१२ (प्रतिनिधी) महिलेवर दुष्कर्म केल्याप्रकरणी श्रीकांत देशमुख यांनी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी सोलापूरचे जिल्हा व सत्र न्यायाधीश के.डी. शिरभाते यांच्यासमोर झाली असता न्यायालयाने श्रीकांत देशमुख यांस दि:-16/8/2022 रोजी दुपारी 3 वाजता न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले तसेच श्रीकांत देशमुख यांस दि:-16/8/2022 पर्यंत अटक न करण्याचा आदेश वाढवून दिला.
यात आरोपीतर्फे ऍडव्होकेट मिलिंद थोबडे एडवोकेट आशिष गायकवाड मुंबई एडवोकेट बाबासाहेब जाधव ऍडव्होकेट विनोद सूर्यवंशी एडवोकेट अभिजीत इटकर ऍडव्होकेट निशांत लोंढे यांनी तर सरकारतर्फे ऍड.प्रदीपसिंह रजपूत यांनी तर मूळफिर्यादीतर्फे विद्यावंत पांढरे यांनी काम पाहिले.
