निवृत पोलिस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर म्हणतात मी महायुतीचा उमेदवार
सोलापूर : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप कडून पदवीधर मतदारसंघात स्मिता जाधव, शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे,महाविकास आघाडीकडून पदवीधर मतदारसंघात हर्षदा देशमुख,शिक्षक मतदारसंघात जयंत असगावकर, यांच्यात लढत होत आहे. शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीवरून महायुतीत मिठाचा खडा पडला की काय असे असताना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील निवृत पोलिस अधिकारी व कडवे शिवसैनिक भाऊसाहेब आंधळकर यांनी पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढवित आहे,आणि माझ्या मागे एकनाथ शिंदे यांचा आशिर्वाद आणि पाठिंबा आहे असे जाहीररित्या सांगितले. शिवसेना शिंदे पक्षाचे नेते व राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आंधळकर यांच्या घरी जाऊन ट्विस्ट निर्माण केला आहे.
महायुतीत पहिल्यांदाच ट्विस्ट वर ट्विस्ट - एकनाथ शिंदेचे अत्यंत विश्वासू मंगेश चिवटे यांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र ऐनवेळी माघार घ्यावी लागली. मात्र मोठा ट्विस्ट आला म्हणजे एकनाथ शिंदेंनी आपला अधिकृत उमेदवार बाहेर काढून पुणे शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा दिला, त्याबाबत अधिकृत रित्या पाठिंबा असल्याची प्रतिक्रिया देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. विशेष म्हणजे मंगेश चिवटे यांनी जाहीरपणे सचिन सानप यांच्यासोबत एकत्रित येत पत्रकार परिषद घेत शिवसेनेचे पाठिंबा असल्याची माहिती दिली. शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीवरून महायुतीत मिठाचा खडा पडला की काय असे वातावरण निर्माण झाले आहे.
आंधळकर म्हणाले;मी सुद्धा महायुतीचा उमेदवार -
निवृत्त पोलिस अधिकारी व एकनाथ शिंदे शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी बोलताना प्रतिक्रिया दिली, मी देखील पुणे पदवीधर मतदारसंघात महायुतीचा उमेदवार आहे. भूमिपुत्र म्हणून माझ्या कडे पदवीधर मतदार मोठ्या संख्येने आहेत. भाऊसाहेब आंधळकर यांच्या उमेदवारी आणि त्यांच्या वक्तव्याकडे पाहता महायुती मध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे.
भाजपच्या बैठकावर बैठका - भाजपचे प्रदेशाध्यक्षक रवींद्र चव्हाण पालकमंत्री जय कुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपची पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारांची बैठक होत आहेत. महायुतीमध्ये पहिल्यांदाच असा घडतंय स्वतःला महायुतीचे उमेदवार जाहीर करत महायुती मधील भाजपासमोरील आव्हान तगडे होत चालले आहे. या सर्व घडामोडी कडे पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात दुरावा वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
