Ticker

6/recent/ticker-posts

फारुक शाब्दीनी राजीनामा दिल्यानंतर भर सभेत असद ओवेसींनी खोटं बोललं...


असद ओवेसीं तर मोदी पेक्षा मोठे फेकू;ओवेसीचा तो चुनावी जुमला आठवतंय का...?

मकबूल शाब्दीशी चर्चा करून राजीनामा मंजूर करतो;असद ओवेसींनी सांगितलं होतं आठवण आहे का....?

फारुक शाब्दीचे वडील म्हणाले ओवेसींशी माझी काहीही चर्चा झाली नाही

सोलापूर : AIMIM पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असद ओवेसींनी भारी राजकारण खेळत सोलापूरकराना वेड्यात काढलं. फारुक शाब्दी यांचे वडील मकबूल शाब्दी यांच्याशी चर्चा करतो त्यानंतर फारुक शाब्दी यांचा राजीनामा मंजूर करतो असा शब्द दिला होता. ओवेसीं मोदी पेक्षा मोठे फेकू निघाले. मकबूल शाब्दी यांच्याशी थेट संपर्क साधून अधिक माहिती घेतली असता,मकबूल शाब्दी म्हणाले,ओवेसींनी काहीच संपर्क केला नाही. याचाच अर्थ असा की,सोलापुरातील पानगल मैदानावर सभेत असद ओवेसींनी सभेतील जनतेला खोट बोलून वेळ काढून गेले.





AIMIM पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष आणि राज्य कार्याध्यक्ष फारुक शाब्दी यांनी पाच वर्षे मेहनत घेत पक्षात दरारा निर्माण केला होता. औरंगाबादचे इम्तियाज जलील,मुंबईचे वारीस पठाण यांच्या राजकीय खेळी समोर फारुक शाब्दी टिकू शकली नाही. महानगरपालिका निवडणुकित तिकीट वाटपावरून उडालेला गोंधळ,आणि पक्षात सुरू असलेली वाताहत सहन करू शकले नाही.पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देत फारुक शाब्दी यांनी तडकाफडकी निर्णय घेत स्वतःला AIMIM पक्षापासून वेगळं केलं. महानगरपालिका निवडणुकीत AIMIM पक्षाचे इतर कार्यकर्ते व पदाधिकारी सभा घेत,AIMIM पक्षाची कमान सांभाळत होते.



 महानगरपालिका निवडणुकीत प्रचार सुरू झाला आणि सर्व पक्षाच्या सभांचा सपाटा सुरू झाला. पानगल मैदानावर असद ओवेसींच्या उपस्थितीत AIMIM पक्षाची मोठी सभा आयोजित केली होती.भर सभेत कार्यकर्त्याने डोळ्यात पाणी आणून फारुक शाब्दी यांना पक्षात बोलावून घ्या अशी मागणी केली होती. AIMIM पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ताबडतोब माईक हातात घेऊन सोलापूरक शहरातील मतदाराना उद्देशून शब्द दिला. फारुक शाब्दी यांनी मला न विचारता राजीनामा दिला. फारुक शाब्दी एक शब्दही माझ्या सोबत चर्चा केली नाही. सभा झाल्या नंतर एक दोन दिवसांत शाब्दी यांचे वडील मकबूल शाब्दी यांच्यासोबत चर्चा करतो, त्यांच्या मर्जीने राजीनामा मंजूर करतो.





मकबूल शाब्दी यांच्या सोबत एमडी24न्यूज कडून थेट संपर्क केला. मकबूल शाब्दी म्हणाले असद ओवेसींनी काहीही संपर्क केला नाही. याचाच अर्थ असा होतो,असद ओवेसींचा मोदी सारखं चुनावी जुमला होता.