फारुक भाई "जो वादा किया वो निभाना पडेगा"
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाचे नेते फारुक शाब्दी यांनी भर पत्रकार परिषदेत सांगितले होते, किडनी देणार पण एमआयएम पक्षाचं काम करणार नाही. हजारो कार्यकर्त्यांनी हात जोडून विनंती केली होती. फारुक शाब्दी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. मागील एक वर्षांपासून एमआयएम पक्षाचं शहर अध्यक्ष पद रिकाम आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांनी सोलापूर, नांदेड अशा विविध शहराचे शहर अध्यक्षपद नेमण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. काही रिकामे टेकडे नेते लॉबिंग करत शहर अध्यक्ष होता येईल का याची चाचणी करू लागलेत. एमआयएम शहर अध्यक्ष फारुक शाब्दी होणार आहेत,त्यांच ठरलं आहे. अन्वर सादात यांची मनधरणी केली जात आहे. अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. पण ऐनवेळी निवडणूकीत पक्षाची धुरा सोडून जाणाऱ्या कार्यकर्त्यांची दिशाभूल करणाऱ्या फारुक शाब्दी यांना "जो वादा किया वो निभाना पडेगा" किडनी द्या पण एमआयएम पक्षात येऊ नका.
समजा फारुक भाई तुम्ही एमआयएम पक्षात प्रवेश केलाच...! तर चोहोबाजूंनी विचार करावा. पूर्वी सारखं मान सन्मान एमआयएम पक्षात मिळेल का...!? हा विचार करून पुन्ह प्रवेश करावा. ज्यांनी स्वतःच्या हिमतीवर नगरसेवक निवडणूक जिंकली,काही प्रभागात उमेदवारांचा निसटता पराभव झाल ते उमेदवार तुम्हाला माफ करतील का...? याचा अभ्यास करावा. फक्त पैशाच्या जोरावर सगळं ठीक करू हा ओव्हर कॉन्फिडन्स बाजूला ठेवा. सगळं काही पैसा असला असता तर अंबानी,अडानी हे पंतप्रधान आणि राष्ट्रपती झाले असते. तुम्हाला चांगलं बिजनेसमन बनता आलं मात्र चांगलं राजकारण करता आलं नाही. संधीच सोन करणे याला राजकीय माईंड लागतं बिजनेस माईंड राजकारणात चालत नाही.
तुम्हाला खरंच राजकारणात यायचं आणि समाजाचे भले करायचे आहे,असं तुमच्या मनात आहे तर तुम्ही एमआयएम पक्षात जाण्याऐवजी ऐवजी एखाद्या धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या राष्ट्रीय पक्षात प्रवेश करावा. म्हणजे तुमचे दोन्ही किडन्या सुरक्षित राहतील. अन्यथा एक किडनी दान करून पक्षात प्रवेश करावा लागेल. तुम्ही अगोदर तुमचं राजकीय सल्लागार बदलणे गरजेचे आहे. अक्कलकोट तालुक्यातून आयात केलेला पी.ए.बदलावा तरच तुमचं राजकारण सुरक्षित राहील अन्यथा तुमची उतरण सुरूच राहणार.
(तात्पुरता एवढाच...)
