Ticker

6/recent/ticker-posts

आरोग्य खात्यातील हा लिपीक कोण...? वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबनाच्या वाटेवर पोहोचवतो


सोलापूर : आरोग्य खात्यात एका लिपिकाची मोठी चर्चा रंगली आहे.फक्त एका लिपिकामुळे क्षयरोग विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याला निलंबन व्हावं लागलं. हा लिपीक आता दुसऱ्या ठिकाणी रुजू झालंय म्हणे. आरोग्य खात्यातील या लिपिकाच्या त्रासाला कंटाळून अनेक कर्मचारी दुसऱ्या ठिकाणी जाण्याची तयारी दर्शवली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक (सिव्हिल सर्जन) कार्यालयात जाण्यासाठी त्याने अनेकदा प्रयत्न केले होते,मात्र त्याचे प्रयत्न अनेकदा फसले आहे. हा लिपीक ज्या ठिकाणी जातो त्याठिकाणी घाण करून टाकतो अशी चर्चा आरोग्य खात्यात दबक्या आवाजात सुरू आहे. 


जवळीक निर्माण करतो अन् लावालावी करतो - सिव्हिल सर्जन कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना सांगून ठेवलय, याला इथं प्रतिनयुक्तीवर आणायचं नाही अन्यथा आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाऊ. अधिकाऱ्यांशी जवळीक निर्माण करायचं, इतर कर्मचाऱ्यां विरोधात चाड्या करायच्, लावालावी करणे हा त्याचा नेहमीचा धंदा आहे. अधिकाऱ्यांत आणि कर्मचाऱ्यांत वाद निर्माण करायचं,असा फुटलेला चंबू आता कुणाचा बळी घेणार असा प्रश्न आरोग्य खात्यातील कर्मचारी करू लागले आहेत.




आरोग्य खात्यातील तो लिपीक कोण...?
सार्वजनिक आरोग्य खात्यातील तो लिपीक नेमका कोणता असा प्रश्न पडला असेल, मात्र त्याच नाव इतक्यात सांगण उचित नाही,लवकरच त्याचा भांडाफोड होणार आहे. लवकरच त्याची उचलबांगडी होईल आणि उप संचालक (पुणे)कार्यालयापर्यंत सर्व दस्तऐवज पोहोच होणार आहे.या लिपिकाला क्रीम आणि मलईवाला टेबल पाहिजे, म्हणून त्याने आजतागत अनेक उठाठेव केलेत. हा कर्मचारी सिव्हिल सर्जन कार्यालयातील त्या क्रीम टेबलकडे बारीक नजरेने पाहू लागलाय. त्याला स्वप्ने पडू लागली आहेत,कधी मला प्रतिनियुक्ती मिळतेय आणि कधी मी त्या क्रीम टेबलवर जाऊन बसू.मात्र सार्वजनिक आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी सावध राहणे उचित आहे. अन्यथा हा लिपीक अधिकाऱ्यांची कधी दिशाभूल करेल आणि कधी त्या संबंधित अधिकाऱ्याचा बळी जाईल याचा अंदाज लावणे कठीण आहे.