Ticker

6/recent/ticker-posts

एमआयएम पक्षाने आचारसाहिंतेच भंग केलं;आझाद पार्टीने दिले निवेदन


पदवीधर अन् शिक्षक आमदारांची निवडणूकीच्या काळात एमआयएम पक्षाकडून घोडचूक

सोलापूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2026 च्या पार्श्वभूमीवर दिनांक 22 सप्टेंबर 2026 पासून आदर्श आचारसंहिता लागू आहे. असे असतानाही सोलापूर शहरामध्ये AIMIM पक्षाच्या वतीने दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी आचारसंहिता लागू झाल्यानंतर शिलाई मशीन व धान्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.तसेच शिक्षकांना "आदर्श शिक्षक पुरस्कार देण्याचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. आचार संहिता असताना एमआयएम पक्षाच्या वतीने पक्षाचा कार्यक्रम घेऊन शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. अजय मैंदर्गीकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन निवेदन दिले . 27 सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या एमआयएम पक्षाच्या या कार्यक्रमात एमआयएम पक्षाचे सर्व नगरसेवक इम्पिरियल हॉल येथे उपस्थित होते.





एमआयएम पक्षाच्या कार्यक्रमामध्ये AIMIM पक्षाचे निरीक्षक तसेच पदाधिकारी,नगरसेवक,आमदार,खासदार व इतर राजकीय व्यक्तींचे मोठे फोटो असलेले बॅनर/फ्लेक्स लावण्यात आले होते. एमआयएम पक्षाने  राजकीय प्रसिद्धी अथवा निवडणूक प्रचारासाठी केला आहे. तसेच या माध्यमातून मतदारांवर कोणताही अनुचित प्रभाव किंवा प्रलोभन टाकण्याचा प्रयत्न झाला आहे का,याबाबत चौकशी होणे आवश्यक आहे अशी मागणी अजय मैंदर्गीकर यांनी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अधिकृत माहिती न मिळाल्यास आम्ही मोठं जनआंदोलन किंवा धरणे आंदोलन याच कार्यालयासमोर करणार असल्याचा इशाराही अजय मैंदर्गीकर यांनी दिला आहे.



विशेषतः सध्याची निवडणूक शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची असल्याने शिक्षकांना पुरस्कार देणे व मोठ्या प्रमाणावर वस्तूंचे वाटप करणे ही बाब अधिक संवेदनशील आहे. त्यामुळे कार्यक्रमातील लाभार्थी, त्यांची निवड, कार्यक्रमाचा खर्च, आयोजक, राजकीय पक्षाशी असलेला संबंध आणि कार्यक्रमाचा निवडणूक प्रचाराशी असलेला संबंध यांची तपासणी करण्यात यावी.तसेच सदर कार्यक्रमासाठी निवडणूक/प्रशासकीय परवानगी घेण्यात आली होती का,कार्यक्रमाचा खर्च कोणाकडून करण्यात आला,शिलाई मशीन व धान्य खरेदीची बिले होते का,याची चौकशी करण्यात यावी.