सोलापूर : सोलापूर महानगरपालिका विभागीय कार्यालय क्र. चार चे मुख्य आरोग्य निरीक्षक शकील अहमद म.इस्माईल नल्लामंदू यांचा सेवा निवृत्ती निमित्त बुधवार 30 सप्टेंबर रोजी भव्य सत्कार करण्यात आला.
शकील नल्लामंदू यांनी 1996 साली सोलापूर महानगरपालिकेत रोजंदारीवर कामाला सुरुवात केली. 2000 साली ते कायम झाले. तीस वर्षाच्या कालावधीत त्यांनी शहरातील सर्वच विभागीय कार्यालयात सेवा बजावली. शेवटी ते विभागीय कार्यालय चार येथून मुख्य आरोग्य निरीक्षक म्हणून 30 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त झोन चारच्या घन कचरा विभागाच्या वतीने त्यांचा सत्कार सोहळा नई जिंदगी येथील हॅपी हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता.
यावेळी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले,मुख्य सफाई अधीक्षक अनिल चराटे,विभागीय अधिकारी जगधाने, सावंत,सफाई अधीक्षक सूर्यकांत लोखंडे,आरोग्य निरीक्षक शेषराव शिरसाट,हमीद हिरोली,सादिक शेख,सफाई अधीक्षक तमशेट्टी,सोमनाथ साबळे,दंडू,माजी सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार,आरोग्य निरीक्षक सुनील राठोड,अंबादास भंडारी, मुख्य आरोग्य निरीक्षक संदीप कुरडे,गामा पैलवान,हॅपी हॉल चे मालक अश्फाक शेख,अ.रजाक नल्लामंदू,अय्युब नल्लामंदू,शरजील (अली) नल्लामंदू,अबरार अहमद नल्लामंदू,रईस अहमद नल्लामंदू,चितापुरे सर,शरजील अहमद नल्लामंदू ,इक्बाल तडकल,जावेद बंदूकवाले,जाविद अरब,तौफिक मणियार,कृष्णहरी रंगू,मतीन बागवान,मुन्ना शेखसह विभागीय कार्यालय 4 चे सर्व अधिकारी,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य निरीक्षक शेषराव शिरसट यांनी केले.
