सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान; गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या हस्ते सत्कार
सोलापूर : पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत विशेष कार्य करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी अब्दुल मज्जीद महमंद शेख, शेकाप्पा सिद्राम गाजूल, राजेश देशपांडे, अरुण क्षीरसागर, लतिका लोंढे, नुतन पिसे, राजेंद्र सोनकांबळे, अविनाश भोसले, अक्रम पठाण, पांडुरंग कविटकर, बापू करजखेडे, रमेश सोनके, नागनाथ धोत्रे, सुभाष फुलारी, शंकर जाधव, बादशहा मुल्ला, रमेश गायकवाड, यनमलप्पा चिट्टे आणि भीमाशंकर म्हेत्रे या ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी मनीषा वास्ते, विस्तार अधिकारी ज्योतीराम भोसले, सदाशिव कोळी, शिवानंद सोलापूरे, सुरेश राठोड, कनिष्ठ लेखाधिकारी अंजू पाटील, संदिप घोडके, सुधीर फुलारी, मनोहर राठोड, रुपाली मोरे, जिलानी अन्सारी, रामकृष्ण पाटील, विनायक कुंचपोर, स्नेहा जाधव, शहानवाज शेख, शिवानंद नागूर, भीमाशंकर कोळी, पंडित व्हनमाने आणि अरुणा रांजणे यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी सर्व ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यदायी, आनंदी व सुखी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव आणि सामाजिक योगदान हे समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
